Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 6 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स): आखिल महाराष्ट्र
विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या (Akhil Maharashtra Vishwakarma Sutar
Samaj Mahasangha) पुणे जिल्हा अध्यक्षपदी (Pune District
President) रविंद्र किसनराव रायकर (Ravindra Kisanrao Raikar) यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतच्या नियुक्तीचे प्रमाणपत्र
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव (Dnyaneshwar Bhalerao) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष हनुमंत पांचाळ (Hanumant
Panchal) यांच्या हस्ते, रायकर यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.
मुळचे मावळ
तालुक्यातील चांदखेडचे (Chandkhed,
Maval) असलेले रवींद्र रायकर हे कमिन्स इंडिया (Cummins
Indial LTD) मध्ये कार्यरत आहेत. कमिन्स येथे नोकरी करत असताना, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने (Social Commitment), आपण नोकरी करून समाजासाठी काहीतरी केले
पाहिजे, या प्रेरणेने माझ्या
त्यांनी समाज कार्यास सुरुवात केली असून, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे
वाटप (Distribution
of Educational Materials), अपंग (दिव्यांग)
विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आरोग्यविषयक सहकार्य (Support for Students with Disabilities) करणे, चांदखेड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना
पिण्याच्या शुद्ध पाण्याचे तब्बल साडेचार लाख रुपये खर्चाचे 2 हजार लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण
यंत्र (Water Treatment Plant) बसवण्यासारखे मोठे काम
त्यांनी केले आहे. शाळेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांची शैक्षणिक निकड ओळखून स्वत:च्या
खर्चाने “विद्यार्थी दत्तक योजनेप्रमाणे (Educational Adoption of Student) ते सेवाकार्य करत आहेत”. आजपर्यंत 50 हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणीक दातृत्व
त्यांनी केले आहे.
पूरग्रस्त (Flood Affected), कोविड ग्रस्त
(Covid 19 Affected) नागरिकांना अन्न धान्य वाटप (Distribution
of Food Grains) करणे, पूरग्रस्तांना कपडे व आर्थिक मदत उपलब्ध करून
देणे, ग्रामीण भागातील खेळामध्ये रस असलेले विद्यार्थी जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर चमकण्यासाठी “स्व.
विराज महेंद्र रायकर” स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा (Cricket Tournament) भरवणे, आदिवासी भागात राहणाऱ्या गरीबांना
ब्लँकेट, कपडे, तसेच दिवाळी मध्ये फराळाचे वाटप (Distribution of Snacks and Sweets in Diwali) करून, त्यांचे सणाचा गोडवा
वाढावे, वारकरी शिक्षण संस्थेत सांप्रदायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण
उपयोगी साहित्याचे मदत कार्य, अहमदनगर येथील अँग्लो इंडियन शाळेस (Anglo Indian School) ई लर्निंग
कीट (E Learning Kit) उपलब्ध करून दिले, अशी एक ना अनेक कामे
त्यांच्या नावावर आहेत.
हे कमी म्हणून
की काय, रक्तदानाचे महत्व ओळखून, स्वत: रक्तदान करत, कंपनी आणि समाजातील अनेक रक्तदात्यांच्या माध्यमातून
रक्तदान शिबिरांचे (Blood
Donation Camp) आयोजन करून, गरजवंत रुग्णांना कोणत्याही कारखान्यात तयार न होणाऱ्या
अशा रक्ताचे दान करण्याचे बहुमुल्य सेवाकार्य ते नेहमीच करत असतात. कोरोना काळात काही
जणांना प्लाझ्माची नितांत गरज होती. ही गरज ओळखून तीन वेळा प्लाझ्मा दान (Plazma Donation) करणाऱ्या
रायकर यांचा प्लाझ्मा भारतीय सैन्यातील जवानाला देण्यासारखे देशकार्य रायकर यांनी
केले आहे. पुरातन शिव मंदिर “खुलेश्वर” या मंदिराचा जीर्णोद्धार (Renovation
of Khuleshwar Temple) करून, धार्मिक आणि सांस्कृतिक सलोखा
वाढवण्याचे महत्वपूर्ण कार्य रायकर यांच्या नावावर आहे. “वाचाल तर वाचाल” या उक्तीला
जागत, वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी वाचनीय पुस्तकांचे वाटप, ग्रंथालय
(Library) निर्मितीसाठी सहकार्य, छोटेखानी कवी संमेलनाचे आयोजन, तसेच गावगाडा साहित्य पुरस्काराचे (Gavgada Literary Award) आयोजन करण्यातही
रवींद्र रायकर हे अग्रेसर असतात. यासह अनेक सामाजिक कामांचा उल्लेख रविंद्र रायकर
यांच्या नावावर आहे. त्यामुळे रायकर यांची सुतार समाज महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी
झालेली निवड सार्थ (Worthwhile Choice) असल्याची भावना
समाजातून व्यक्त केली जाते आहे.
यावेळी आखिल सुतार समाज महासंघाचे कार्याध्यक्ष गणपतराव गायकवाड (Ganpatrao
Gaikwad), सुरेश भालेराव (Suresh Bhalerao), नथुराम
मानमोडे (Nathuram Manmode), दगडू काळे (Dagadu Kale), आळंदी धर्मशाळेचे अध्यक्ष बाळासाहेब टकले (Balasaheb Takale), कार्यालयीन प्रमुख भरत भालेराव (Bharat Bhalerao),
मावळ तालुक्यातील रमेश सुतार (Ramesh Sutar), अशोक आनंदे (Ashok
Anande), भरत भालेराव (Bharat Bhalerao), राम सुतार
(Ram Sutar), शांताराम वाकचौरे (Shantaram Waghchoure), गजानन चव्हाण (Gajanan Chavan), शिवाजी सुतार
(Shivaji Sutar), कमलाकर तंबोरे (Kamlakar Tambore), पिंपरी चिंचवड अध्यक्ष चंद्रकांत भालेराव (Chandrakant Bhalerao) यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रविंद्र रायकर यांना हे
नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या निवडीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र रायकर
आपल्या कामाची छाप पूर्ण जिल्ह्यात उमटवतील अशा प्रकारची खात्री समाजाकडून व्यक्त
केली जात आहे. समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे.
रविंद्र रायकर यांचा संपर्क क्रमांक : 98906 71938
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक
करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share