Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 18 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स):
पुणे महानगरपालिका (PMC
Pune) प्रशासकाच्या हातात गेल्यापासून मनमानी कारभार (Arbitrary
Administration) सुरु असल्याची अनेक उदाहरणे समोर येत असताना,
कर्वेनगर मधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चांगला गुळगुळीत
डांबरी रस्ता (Tar Road) उकरून तेथे सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता
(Cement Road) बनवला गेला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे
कमी म्हणून की काय, संबंधित ठेकदार नियमबाह्य पद्धतीने (I’llegal Manner) या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची (Security) चोख अंमलबजावणी न केल्यामुळे
विद्यार्थ्यांचे अपघात (Student Accidents) होऊन, विद्यार्थी
जखमी होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. तसेच या कामासाठी सुरुवातीला वीज आणि पाण्याची
कशी व्यवस्था केली, याची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.
याबाबत कर्वेनगर मधील काही ज्येष्ठ नागरिकांनी (Senior Citizens) चेकमेट
टाईम्सकडे (Checkmate Times) केलेल्या तक्रारीनुसार,
कर्वेनगर स्मशानभूमी (Karvenagar Crematorium) ते वेदांत
मंगलम कार्यालय (Vedanta Mangalam) रस्त्यावर पुणे
महानगरपालिकेची भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल (Bharat
Ratna Dr A.P.J. Abdul Kalam E Learning School) नावाने शाळा असून,
या शाळेच्या समोरील गल्लीमध्ये चांगल्या दर्जाचा, एकही खड्डा नसलेला गुळगुळीत
डांबरी रस्ता अस्तित्वात होता. जो की जेमतेम दोनच वर्षांपूर्वी करण्यात आलेला
होता. तर या रस्त्यावर केवळ याच शालेय विद्यार्थी आणि पालकांची वर्दळ वगळता,
कोणतीही सार्वजनिक वाहतूक (Public Transport) रस्त्यावर
नसते. असे असतानाही गरज नसताना, नागरिकांच्या करातून जमा झालेल्या पैशांचा अपव्यय
(Waste of Money) करत, हा चांगला रस्ता उकरून, सिमेंट कॉंक्रीटचा
रस्ता करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता करत असताना, ठेकेदाराने कोणत्याही
प्रकारच्या रस्ता बांधकाम नियमांचे पालन न करता रस्ता केला असल्याची तक्रार
नागरिकांनी केली आहे. त्याचबरोबर या रस्त्याच्या कामासाठी व्हायब्रेटर (Vibrator)
वापरण्यात आलेला असताना, त्यासाठी कोठून वीजपुरवठा (Electricity) घेण्यात आलेला होता. कामाच्या दरम्यान कुठल्या पाण्याचा वापर केला गेला. याची
चौकशी (Enquiry) करण्याची मागणी होऊ लागली आहे. तर काम चालू
असताना येथे पालिकेचा कोणताही अधिकारी (Officer) अथवा
सुपरवायझर (Supervisor) देखरेखीला नव्हता अशीही धक्कादायक
माहिती ज्येष्ठ नागरिकांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना दिली. हे कमी म्हणून की काय
रस्ता तयार होऊन अनेक दिवस उलटले तरी रस्त्याच्या साईड पट्ट्या तशाच ठेवल्या आहेत.
त्यात रस्त्याच्या उकरलेल्या डांबरीकरणाचा राडारोडा पडलेला आहे. त्यामुळे तेथून
घसरून पडल्याने विद्यार्थ्यांना दुखापत होण्याच्या घटना घडल्या आहेत. पालकांची
वाहने खाली घसरून पडत आहेत. यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होऊ लागली
आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share