Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
Bharati Vidyapeeth,
Dhankawadi area seals new parking rules; Such will be the changes
पुणे, दि. 7 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील
वाहतुक (Pune City Traffic) सुरक्षित व सुरळीतपणे (Safely
and Smoothly) होणेकरीता महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या
नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायद्याच्या (Motor Vehicle Act) कलमाचा वापर करून पुणे शहर वाहतूक पोलीस नेहमीच निरनिराळे निर्णय घेत
असतात, प्रयोग करत असतात. असेच काही बदल भारती विद्यापीठ
वाहतूक विभागाने (Bharati Vidyapeeth Traffic Department) घेतले आहेत. त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता
पार्किंगचे नवीन नियम लागू करण्यात आले असून, त्याबाबत पोलीस उप-आयुक्त (वाहतुक)
विजयकुमार मगर (DCP Traffic Vijay Magar) यांच्या
सहीने एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यात भारती विद्यापीठ वाहतुक विभागातील (Bharati Vidyapeeth Traffic Devision) काही रस्त्यांवर पार्किंग नियमाबाबत (Parking Slots) बदल करण्यात आले आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने भारती विद्यापीठ वाहतुक विभाग पुणे अंतर्गत, भारती हॉस्पिटल (Bharati Hospital) मुख्य गेट ते पोलीस स्टेशन
(Bharati
Vidyapeeth Police Station) इमारतीच्या उत्तर बाजूकडील पायऱ्या पर्यंत 100 फुट सर्व्हिस रस्त्याच्या
(Service Road) पश्चिमेकडील बाजू व भारती हॉस्पिटल मुख्य गेट ते पोलीस
स्टेशन इमारतीच्या उत्तर बाजूकडील भिंतीचे टोकापर्यंत पुर्वेकडील बाजू नो पार्कीग करण्यात
येत आहे. तर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन इमारतीच्या पायऱ्यापासुन पुढे पोलीस स्टेशनच्या
उत्तर बाजूकडील भिंतीचे टोकापर्यंत पोलीसांची सरकारी चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी
मार्किंग करून जागा आरक्षित (Reserved Parking for Police Vehicles) करण्यात येत आहे. व त्यापासून पुढे चैतन्यनगरकडे (Chaitanya Nagar) डावीकडे वळणाऱ्या रोडचे टोकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुंना दुचाकी व चारचाकी
वाहनांकरीता पी-1 आणि पी-2 पार्किंग करण्यात येत आहे. त्यामध्ये 50 फुट अंतर पोलीस
अधिकारी व अंमलदार यांची खाजगी दुचाकी वाहने पार्क करण्याकरीता जागा आरक्षित
(Reserved Parking for Police Officers Private Vehicles) करण्यात येत
आहे.
त्याचबरोबर धनकवडी
(Dhankawadi) भागातील तीन हत्ती चौकाकडुन (3 Hatti Chowk) संभाजीनगरकडे (Sambhaji Nagar, Dhankawadi) जाणाऱ्या
व येणाऱ्या रोडच्या दोन्ही बाजूस 100 मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग
करण्यात येत आहे. तीन हत्ती चौकाकडुन तळजाई स्मशानभुमीकडे (Taljai Cemetery) जाणाऱ्या व येणाऱ्या
रोडच्या दोन्ही बाजूस 100 मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात
येत आहे. तीन हत्ती चौकाकडुन
शनिमंदिर, पद्मावतीकडे
(Shani Mandir, Padmavati, Pune) जाणाऱ्या व येणाऱ्या रोडच्या दोन्ही बाजूस 100 मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या
वाहनांना नो पार्कींग करण्यात येत आहे. याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी. या भागात
मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु करण्यात आलेल्या (Action on No Parking
Vehicles) असून, नागरिकांनी आपापली वाहने विहित पार्किंगच्या
ठिकाणीच पार्किंग करून, आपल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची
काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणत्याही
सबबीखाली सवलत न देता (No Excuse) कठोर कारवाई करण्याचे संकेत
भारती विद्यापीठ वाहतूक विभागाने दिले आहेत.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक
करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share