Type Here to Get Search Results !

वारजे मध्ये कारच्या काचा फोडल्या, दुचाकी पेटवल्या; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Car windows were broken, two-wheelers were set on fire in Warje; A case has been registered against unknown persons

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Car windows were broken, two-wheelers were set on fire in Warje; A case has been registered against unknown persons


 

पुणे, दि. 16 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): वारजेतील रामनगर (Warje Ramnagar) भागात पुन्हा एकदा मोटारीच्या काचा फोडणे (Car Glass Broke), दुचाकी पेटवून (Bikes Fired) दहशत माजवण्याची घटना दिवाळीच्या उत्तरार्धात (Diwali Night) घडल्याने रामनगर परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (PI Sunil Jaitapurkar), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) यांनी याबाबतची माहिती घेत, तत्काळ तपासाचे (Investigation) आदेश दिले.

 

 

याबाबत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वारजे रामनगर मधील पाण्याची टाकी (Warje Ramnagar Water Tank) चौक येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिन दुचाकी पेटविण्यात आल्या असुन, एका चारचाकी वाहनाची काच फोडून वाहनांचे नुकसान केले आहे. दुचाकीच्या लागलेल्या आगीच्या ज्वालांच्या झळीने शेजारील एका रिक्षाचे (Rickshaw) देखील नुकसान झाले आहे. ही घटना आज गुरूवार दि. 16 नोव्हेंबर 2023 पहाटे पावणे दोनच्या सुमारास घडली. दुचाकी वरून आलेल्या 2 अज्ञातांनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता नागरिकांतुन वर्तविली असुन, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (CCTV Footage) झाला आहे. याबाबत स्थानिक गाडी मालकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला (Pune City Police Control Room) कळवल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वारजे पोलिसांनी घटनेबाबत तत्काळ वरिष्ठांना कळवत अज्ञातांचा शोध सुरु केला. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयित व्यक्ती आढळून आल्या नाहीत. याबाबत वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.