Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 23 नोव्हेंबर 2023
(चेकमेट
टाईम्स): वारजे रामनगर (Warje
Ramnagar) मध्ये काही गाड्यांच्या काचा फोडणे (Glass Burst) आणि पेटवण्याची (Vehicles Fired) घटना ताजी
असतानाच आता पुन्हा एकदा काही चारचाकी वाहनांच्या काचा फोडून, दहशत पसरवत, काही
पादचाऱ्यांना देखील लुटण्याची (Robbery) घटना समोर आली आहे.
याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, वारजे पोलीस (Warje Police) पुढील तपास करत आहेत.
याबाबत वारजे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकडे अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडीयम (Narendra Modi
Stadium Ahmedabad) मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपचा अंतिम
सामना (India vs Australia World Cup Final Match)
संपल्यानंतर, इकडे पुण्यात एकामागे एक कायदा सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना घडल्या. त्यात उत्तमनगर मधील एका वाईन शॉप
(Uttamnagar Wine Shop) वर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला
(Robbery by Armed Robbers), तर वारजे पोलीस स्टेशन (Warje
Police Station) हद्दीतील यशोदीप चौक (Yashodeep Chowk) ते सहयोग नगर (Sahyog Nagar) पाण्याच्या टाकीकडे
जाणाऱ्या रस्त्यावरील बालाजी कॉलनी (Balaji Colony) जवळ
लावण्यात आलेल्या जवळपास 10 ते 15 गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या. तर काही जणांना
धारदार हत्यारांचा धाक दाखवून लुटण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या मनात एकच खळबळ
उडाली आहे.
यामधील पहिल्या
घटनेत रविवार दि.19 नोव्हेंबर 2023 रात्री साडे अकराच्या सुमारास, वारजे माळवाडी
मधील अमर भारत सोसायटी (Amar Bharat Society) मध्ये असलेल्या सद्गुरू किराणा
स्टोअर (Sadguru Kirana Store) जवळ चार जणांनी फिर्यादी राजन
बाबूलाल दास (Rajan Babulal Daas) (वय.18 रा.वारजे माळवाडी,
पुणे) आणि त्याचा मित्र रोहितकुमार (Rohitkumar) हे
मोटारसायकल वरून घरी जात असताना, चार अज्ञातांनी त्यांना अडवून, त्यांना बांबूने
आणि कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करत, त्यांच्याकडील 700 रुपयांची रोकड,
जबरदस्तीने काढून घेतली. तसेच यावेळी हवेत कोयते फिरवून नागरिकांच्या मनात दहशत
निर्माण केल्याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या
घटनेत त्याच मध्यरात्री सोमवार दि.20 नोव्हेंबर 2023 पहाटे दीड ते पावणे दोनच्या
दरम्यान, फिर्यादी अभिजित बिभीषण धावणे (Abhijeet Bibhishan Dhawane) (वय.30, रा. त्रिमूर्ती सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे) हे आपल्या
मोटारीतून शिवाजीनगर (Shivaji Nagar) येथे वडिलांना आणायला
जात असताना, यशोदीप चौक ते सहयोग नगर पाण्याची टाकी, विठ्ठलनगरकडे (Vitthal
Nagar) जाणाऱ्या रस्त्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांची
गाडी अडवून, त्यांना हाताने मारहाण करत, कोयत्याचा धाक दाखवून, त्यांच्याकडील 4
हजार रुपये काढून घेत, त्यांच्या गाडीच्या काचा फोडून, परिसरातील नागरिकांच्या
इतरही वाहनांच्या काचा फोडून, सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण होईल, अशी
वर्तणूक केली असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तमनगर मध्ये
झालेला सशस्त्र दरोडा आणि त्यानंतर घडलेल्या दोन्ही घटनांनंतर शहर पोलीस दलातील
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्तमनगर (Uttamnagar Police Station) आणि
वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) हद्दीतील घटनास्थळांना
भेटी देत, तत्काळ तपासाचे आदेश दिले. त्यावरून तपास करत असताना वारजे पोलीस
स्टेशनच्या तपास पथकाला संशयितांची नावे निष्पन्न होऊन, त्यांचा शोध घेत, त्यांना
शिताफीने ताब्यात घेत, विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी दोन्ही लुटीचे
गुन्हे आणि गाड्या आपणच फोडल्या असल्याचे कबूल केलेवरून, अविनाश सुरेश गंपले (Avinash Suresh Gampale) (वय 20,
रा. अमरभारत सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे), विशाल संजय सोनकर (Vishal Sanjay Sonkar) (वय 20, रा. स्नेहा विहार, शिवणे,
पुणे), सत्यपाल पवन राठोड (Satyapal Pawan Rathod) (वय 20, रा.
विठ्ठलनगर, वारजे माळवाडी,
पुणे) आणि एका अल्पवयीनाला अटक ताब्यात घेण्यात वारजे पोलिसांना यश आले.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share