Type Here to Get Search Results !

कोरोना घोटाळा; पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Corona Scam; A case has been filed against the medical officers of the municipality in Warje police station


 

Corona Scam; A case has been filed against the medical officers of the municipality in Warje police station

 

पुणे, दि. 24 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): सध्या राज्यात मुंबई मधील कोविड (Mumbai Covid Scam) काळात घेतलेल्या शव पिशव्यांच्या घोटाळ्याची (Dead Body Bag Scam) चर्चा मोठ्या प्रमाणात होत असताना, इकडे पुण्यातून देखील जवळपास 80 ते 90 लाख रुपयांच्या कोविड स्वॅब टेस्टिंग कीटच्या घोटाळ्याचे (Covid Swab Testing Kit Scam) प्रकरण समोर आले आहे. याबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर (Court Order) वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख (PMC Pune Chief of Health), वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या (Warje Karvenagar Regional Office) क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी (Regional Medical Officer) आणि बारटक्के रुग्णालयाचे (Bartakke Hospital) तत्कालीन स्वॅब सेंटर प्रमुखावर (Swab Centre Chief) गुन्हा दाखल करण्यात आला (FIR against ) आहे. याबाबत डॉ. सतीश कोळसुरे (Dr. Satish Kolsure) (वय 42, रा. नवी सांगवी, पुणे) यांनी वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2021 मध्ये घडला होता.


 

 

यातील फिर्यादी डॉ. सतीश कोळसुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वारजे येथील महानगरपालिकेच्या कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात (PMC Pune OPD in Warje Pune) सन 2021 मध्ये कोरोना (Corona) काळात पुरविण्यात आलेले कोविड टेस्ट साठी लागणारे साहित्य, टेस्टिंग किट (Antigen Test Kit), सॅनिटायझर (Sanitizer), औषधे (Medicines) इत्यादीचा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सार्वजनिक लोकांचे हिताचे काम (Public Welfare Work) करण्याची जबाबदारी असताना व त्यांनी प्रामाणिकपणे नोकरी करण्याचे कर्तव्य असताना देखील, त्यांनी स्वत:चे हितासाठी व स्वार्थासाठी संगनमत करुन, त्यांचे इतर साथीदार यांना हाताशी धरुन, सरकारी कागदपत्रांमध्ये अनेक फेरफार करून, खोटी कागदपत्रे तयार केली. तसेच ती सत्य आहेत असे महाराष्ट्र शासन (Govt of Maharashtra) व पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) यांना दाखवुन, त्यामध्ये पैसे कमवले.


 

 

तसेच त्यांनी संगनमत करून कोळीड टेस्टसाठी येणाऱ्या लोकांचे नोंद वही मध्ये अनेक खोट्या नोंदी (False Records) नमूद करून, त्यांचेच सेंटर मधील कर्मचाऱ्यांचे आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक नमूद करवुन, त्याची कॉम्प्युटर मध्ये नोंद घेवून, ती महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिका यांचे कडून ज्या टेस्टिंग किट्स आलेल्या होत्या, त्या सर्व वापरल्या असे दाखवून, त्या टेस्टिंग कीट बाहेर खाजगी लॅब (Private Pathology Lab) व व्यक्तींना विक्री करुन, त्यांचे पैसे घेऊन आर्थिक फायदा घेतला आहे. तसेच ती सर्व कागदपत्रे खरी आहेत असे भासवून, त्यामध्ये अंदाजे साधारणपणे 80 ते 90 लाख रुपयाची अफरातफर (Fraud) केल्याचे डॉ सतीश कोळसुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.


 

 

यामध्ये स्वॅब सेंटरवर आलेल्या 18 हजार 500 तपासणी किटपैकी 60 ते 80 टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करून त्याजागी तब्बल 11 हजारांहून अधिक बोगस रुग्णांच्या नोंदी केल्याचा प्रकार असल्याचे कोळसुरे यांनी म्हटले असून, याबाबत तक्रारदार डॉ. सतीश कोळसुरे यांनी अ‍ॅड. नितीन नागरगोजे (Adv. Nitin Nagargoje) यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश सी. एस. पाटील (Judicial Magistrate C. S. Patil) यांनी वारजे पोलिसांनी याचा सखोल तपास (Deep Investigation) करुन अहवाल सादर करावा असा आदेश दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा सुर्यकांत तारडे (Dr. Aruna Suryakant Tarde) (रा.गणेशनगर, दापोडी, पुणे), स्वॅब सेंटरचे प्रमुख डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी (Dr. Hrishikesh Hanumant Gardi) (रा.स्वामी विवेकानंद सोसायटी, वारजे, पुणे) आणि तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (Dr. Ashish Bharti) (रा. पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलमानुसार फसवणूक व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर (PI Sunil Jaitapurkar) पुढील तपास करीत आहेत.


 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.