Type Here to Get Search Results !

बापरे... चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ब्लेडचे तुकडे खायला लावले; उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

Shocking... On suspicion of character, wife was made to eat pieces of blade; Incident in Uttamnagar police station limits


Shocking... On suspicion of character, wife was made to eat pieces of blade; Incident in Uttamnagar police station limits

 


पुणे, दि. 16 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): चारित्र्यावर संशय घेऊन (Character Doubt) पत्नीला ब्लेडचे तुकडे (Blade Pieces) गिळायला लावुन तिचा खून करण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यातील उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station, Pune) हद्दीत असलेल्या शिवणे (Shivane) परिसरातून समोर आला आहे. याबाबत महिलेच्या नराधम पतीला उत्तमनगर पोलिसांनी गजाआड (Husband Behind Bar) केले आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील पती पत्नी शिवणे मधील “समर्थ टेरेस” (Samartha Terrace) या सोसायटीत राहतात. यातील फिर्यादी महिलेचा पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरुन त्यांच्यात वाद होऊन आरोपी पती त्यांना शिवीगाळ करुन (Abusing Words) हाताने मारहाण (Beating) करायचा. त्याचबरोबर मारहाण करणाऱ्या पतीचा भाऊ काही महिन्यापूर्वी त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याला घरात दारू पिण्यास फिर्यादी महिलेने मनाई केली (Prohibited for Drinking Alcohol) होती. याचा राग मनात धरून ऑक्टोबर 2023 ते 8 नोव्हेंबर 2023 दरम्यान फिर्यादी महिलेला या नराधम पतीने कॅल्शीअमच्या कॅप्सुलमध्ये (Calcium Capsules) ब्लेडचे तुकडे टाकून ते गिळायला लावले. यामध्ये महिलेच्या घशात मोठ्या प्रमाणात जखमा (Throtal Wounds) होऊन, त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न झाला.

 

 

याबाबत महिलेने पती विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पती सोमनाथ साधु सपकाळ (वय 45 रा. समर्थ टेरेस, कामठे वस्ती, शिवणे, उत्तमनगर, पुणे) (Somnath Sadhu Sapkal) याच्या विरोधात, पत्नी छाया सोमनाथ सपकाळ (वय 41) (Chhaya Somnath Sapkal) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न, कौटुंबिक हिंसाचार कायद्यासह (Domestic Violence Act) विविध कलमांखाली तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करुन सोमनाथ सपकाळ याला अटक करण्यात आली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार (PSI Shubhangi Pawar) पुढील तपास करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.