Type Here to Get Search Results !

वारजे मधील नियोजित मराठा मशाल मोर्चा ठरलेल्या नियोजनाप्रमाणे होणार; हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


The already congested Warje road will become more congested; Because the storm of the Marathas will blow over it


 

The already congested Warje road will become more congested; Because the storm of the Marathas will blow over it

 

पुणे, दि. 1 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): मराठा आंदोलनाचे नेतृत्व असलेल्या मनोज जरांगे यांनी आपले फक्त उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्रभरात चालू असलेली साखळी उपोषणे चालू ठेवण्यास सांगितले आहेत. त्यामुळे वारजे मधील नियोजित मशाल मोर्चा हा शांतता पद्धतीने, संविधानाला धरून होणारच आहे. त्यामुळे कोणीही आंदोलन स्थगित झाले आहे मग मोर्चाही स्थगित होईल असा भ्रम न बाळगता, अधिकाधिक संख्येने या मशाल मोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.



वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील सकाळी आणि सायंकाळी नियमितपणे वाहतूक कोंडीने जाम (Traffic Jam) असलेला रस्ता शुक्रवार दि.3 नोव्हेंबर 2023 सायंकाळी पक्का जाम होणार आहे. त्याला कारणही तेवढेच महत्वाचे असून, या रस्त्यावर मराठ्यांचे वादळ घोंगावणार (Maratha Mashal Morcha) आहे. त्याबाबत वारजे मध्ये सकल मराठा समाजाच्या (Warje Sakal Maratha Samaj) वतीने आज बुधवार दि.1 नोव्हेंबर 2023 बैठक पार पडली आणि त्यात शुक्रवारी गणपती माथा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक (Dr. Babsaheb Ambedkar Chowk), वारजे जुना जकात नाका (Warje Jakat Naka) पर्यंत पायी मशाल मोर्चा (Torch March) काढण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे.

 

 

रविवार दि.29 ऑक्टोबर 2023 रोजी वारजे मधील हायवे उड्डाणपुलाखाली (Warje Fly Over) बहुजन चळवळीतील संघटनांच्या (Bahujan Movement) वतीने मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाला पाठींबा (Hinger Strike) देण्यासाठी निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये सर्वपक्षीय सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले होते. तर त्यानंतर काल मंगळवार दि.31 ऑक्टोबर 2023 सायंकाळी शिवणे (Shivane) मधील शिंदे पूल (Shinde Pool) ते न्यू कोपरे गाव (New Kopare Gaon) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial) दहा हजारांपेक्षा अधिक जणांच्या शांततामय मशाल मोर्चाने एक विक्रम स्थापित (Record Break Morcha) केला. त्याचवेळी कर्वेनगर (Karvenagar) मध्ये देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, वारजे जुना जकात नाका राजाराम पुलाजवळील (Rajaram Bridge) विठ्ठल मंदिरापर्यंत (Vitthal Mandir) सकल मराठा समाजाच्या वतीने कॅण्डल मार्च (Candle March) काढण्यात आला. यानंतर आता वारजे माळवाडी मध्ये देखील मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

शुक्रवार दि.3 नोव्हेंबर 2023 सायंकाळी साडेपाच वाजता वारजे माळवाडीच्या गणपती माथ्यावर असलेल्या पावशा गणपती मंदिरापासून (Pavsha Ganapati Temple, Ganapati Matha, Warje Malwadi, Pune) या पायी मशाल मोर्चाला सुरुवात होणार असून, तो मुख्य एनडीए रस्त्याने (NDA Road) वारजे माळवाडी बस स्टॉप (Warje Malwadi Bus Stop), वारजे हायवे चौक, तपोधाम (Tapodham) मार्गे जुन्या जकात नाक्यावर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात या मशाल मोर्चाची सभेने सांगता होईल. यामध्ये हजारो मराठा बांधवांसह सर्व जाती धर्माचे बांधव सहभागी होत, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देणार आहेत. शांततामय पद्धतीने होणाऱ्या या मशाल मोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

दरम्यान या रस्त्यावर सायंकाळी साधारण पाच वाजल्यापासूनच नित्याने वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत असते. सायंकाळी शाळा आणि ऑफिसेस सुटण्याची ही वेळ असल्याने प्रत्येकाला घरी जाण्याची घाई असते. त्यातच अरुंद रस्ता आणि वाहतूक पोलिसांची कमतरता असल्याने या टप्प्यातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करत घरी पोचावे लागते. त्यातच या मोर्चाची वेळ सायंकाळी साडेपाचची असल्याने या वाहतूक कोंडीत भर पडणार यात शंका नाही. त्यामुळे शक्यतो शाळेतून सुटलेल्या शालेय विद्यार्थी आणि रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवांच्या वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणून, इतर वाहनचालकांनी या रस्त्यावर वाहने आणण्याचे टाळल्यास, अथवा दुसरे पर्यायी मार्ग वापरल्यास संभाव्य वाहतूक कोंडी टळेल.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

 

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.