Type Here to Get Search Results !

सिंहगड रस्त्यावर पुन्हा पार्किंगचे नवीन बदल; दंड लागण्यापूर्वी नक्की वाचा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


New parking changes on Sinhagad road again; Read carefully before getting fined

 

 

पुणे, दि. 6 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील वाहतुक (Pune City Traffic) सुरक्षित व सुरळीतपणे (Safely and Smoothly) होणेकरीता महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायद्याच्या (Motor Vehicle Act) कलमाचा वापर करून पुणे शहर वाहतूक पोलीस नेहमीच निरनिराळे निर्णय घेत असतात, प्रयोग करत असतात. असेच काहीबदल 6 ऑगस्ट 2023 रोजी सिंहगड रोड वाहतूक विभागाने (Sinhagad Road Traffic Department) घेतले होते. त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता त्या हरकती आणि सूचनांचा विचार करून, पुन्हा एकदा नव्याने काही फेरबदल करण्यात आलेले असून, त्याबाबत पोलीस उप-आयुक्त (वाहतुक) विजयकुमार मगर (DCP Traffic Vijay Magar) यांच्या सहीने एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यात सिंहगड रोड वाहतुक विभागातील काही रस्त्यांवर पार्किंग नियमाबाबत (Parking Slots) बदल करण्यात आले आहेत.

 

 

1. गोयलगंगा (Goyalganga) चौकाकडुन सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाकडे (Sinhgad Road Ward Office) जाताना, गोयलगंगा चौकापासुन रोडचे दोन्ही बाजूस 30 मीटर पर्यंत नो पार्किंग झोन (Sinhgad Road No Parking Zone) तयार करण्यात येत आहे.

 

2. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाकडून गोयलगंगा चौकाकडे जाताना, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय चौकापासून रोडचे दोन्ही बाजूस 30 मीटर पर्यंत नो पार्किंग झोन तयार करण्यात येत आहे.

 

3. गोयलगंगा चौकाकडुन सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाकडे जाताना, गोयलगंगा चौक ते आयसीआयसीआय बँक (ICICI Bank Sinhgad Road) ते अमृतगंगा सोसायटी (Amrutganga Society) गेट नं. 4 (शोरबा हॉटेल, Sorba Hotel) पर्यंत रोडचे डाव्या बाजुला फक्त दुचाकी वाहनांकरीता पार्कींग (Two Wheeler Parking) व्यवस्था करण्यात येत आहे.

 

4. गोयलगंगा चौकाकडुन सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय चौकाकडे जाताना, रोडच्या उजव्या बाजूस दुभाजक संपलेनंतर मनपा प्रस्तावित नाटयगृह (PMC Pune Proposed Theater) ते अतिथी हॉटेल (Atithi Hotel) पर्यंत फक्त चारचाकी वाहनांकरीता पार्किंग (Four Wheeler Parking) व्यवस्था करण्यात येत आहे.

 

5. गोयलगंगा चौकाकडुन सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय चौकाकडे जाताना, रोडच्या उजव्या बाजूस एचडीएफसी बँकेपासून (HDFC Bank Sinhgad Road) ते सोबा ऑप्टिमा सोसायटीचे (Soba Optima Society) गेट (प्रेमाचा चहा शॉप, Premacha Chaha) पर्यंत फक्त दुचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

 

 

हे बदल करण्यात येत असून (Changes will be Applicable), नागरीकांनी याबाबत आपल्या काही सुचना असल्यास त्या पोलीस उप-आयुक्त वाहतूक नियंत्रण शाखायेरवडा पोस्ट ऑफीसबंगला नं 6, जेल रोड, पुणे यांचे कार्यालयात रविवार दि. 5 नोव्हेंबर 2023 ते रविवार दि. 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात. नागरीकांच्या सूचना व हरकती (Suggestions and Objections) विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेडपोलीस वाहनेरुग्णवाहीका इ.) (Fire Brigade, Police Vehicles, Ambulance etc.) खेरीज करून अंतिम आदेश काढण्यात येतील, असे वाहतूक विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.