Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
No parking in this area of Swaminarayan Temple and Bharati Vidyapeeth Traffic Devision, objections and notices sought
पुणे, दि. 7 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील
वाहतुक (Pune City Traffic) सुरक्षित व सुरळीतपणे (Safely
and Smoothly) होणेकरीता महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या
नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायद्याच्या (Motor Vehicle Act) कलमाचा वापर करून पुणे शहर वाहतूक पोलीस नेहमीच निरनिराळे निर्णय घेत
असतात, प्रयोग करत असतात. असेच काही बदल भारती विद्यापीठ
वाहतूक विभागाने (Bharati
Vidyapeeth Traffic Department) घेतले आहेत. त्यावर सूचना आणि
हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पार्किंगचे नवीन नियम लागू करण्यात
आले असून, त्याबाबत पोलीस उप-आयुक्त (वाहतुक) विजयकुमार मगर (DCP Traffic
Vijay Magar) यांच्या सहीने एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून,
त्यात भारती विद्यापीठ वाहतुक विभागातील
(Bharati
Vidyapeeth Traffic Devision) काही
रस्त्यांवर पार्किंग नियमाबाबत (Parking Slots) बदल
करण्यात येणार असून, त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत.
भारती विद्यापीठ वाहतुक
विभागाअंतर्गत येत असलेल्या हेमी पार्क ए,बी,सी,डी सहकारी गृहरचना संस्था मर्या. सोसायटी
(Hemi Park A, B, C, D Cooperative Housing Society) समोरील रस्त्यावर
पुर्वेच्या बाजूस 100 मीटर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन (No
Parking Zone) करण्यात येत आहे. तर मुंबई बंगळुर राष्ट्रीय महामार्ग
48 (Mumbai Benglore National Highway No.48) च्या स्वामीनारायण
मंदिर (Swaminarayan Temple) ओव्हर ब्रिज ते दरी पुलकडे
(Dari Pool Katraj) जाणाऱ्या पुर्वेकडील सर्व्हिस रोडवर रस्त्याच्या
दोन्ही बाजुस 400 मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे. (Changes will be Applicable), नागरीकांनी
याबाबत आपल्या काही सुचना असल्यास त्या पोलीस उप-आयुक्त वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफीस, बंगला नं 6, जेल रोड, पुणे यांचे कार्यालयात रविवार दि. 5
नोव्हेंबर 2023 ते रविवार दि. 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात.
नागरीकांच्या सूचना व हरकती (Suggestions and Objections) विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका इ.) (Fire
Brigade, Police Vehicles, Ambulance etc.) खेरीज करून अंतिम
आदेश काढण्यात येतील, असे वाहतूक विभागाच्या वतीने
कळवण्यात आले आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक
करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share