Type Here to Get Search Results !

धक्कादायक; 100 मीटरवर पोलीस स्टेशन असतानाही, 100 सेकंदाच्या आत उत्तमनगर मध्ये सशस्त्र दरोडा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Shocking; Armed robbery at RR Wines shop in Uttamnagar within 100 seconds, despite police station 100 meters away



Shocking; Armed robbery at RR Wines shop in Uttamnagar within 100 seconds, despite police station 100 meters away

 

पुणे, दि. 22 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): भारत आणि ऑस्ट्रेलिया आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना (India VS Australia ICC Cricket World Cup Final) चालू असताना, इकडे पुण्यात मात्र 100 सेकंदांच्या आत, एका वाईन शॉपवर (Wine Shop) सशस्त्र दरोडेखोरांनी (Armed Robbers) दरोडा (Robbery) टाकत, जवळपास सव्वा तीन लाख रुपयांची लुट केली. विशेष म्हणजे पुण्यातील उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station) पासून 100 मीटर अंतरावर सदरील वाईन शॉप असून, तिकडे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर (Narendra Modi Stadium Ahmedabad) “हेड”ची शतकी खेळी चालू असताना, इकडे वेगळीच शतकी खेळी खेळली गेली. मात्र सिंहगड रोड पोलिसांच्या (Sinhgad Road Police) चाणाक्ष नजरेने सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पाहून तोडं बांधून आलेल्या दरोडेखोरांना ओळखले. त्यातील दोघांना शिताफीने ताब्यात घेऊन, उत्तमनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्याने, पाच जणांचे टोळके चोवीस तासाच्या आत ताब्यात घेण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले असले तरी एक जण अद्याप फरार आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि.19 नोव्हेंबर 2023 अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात “हेड”ची शतकी खेळी चालू असताना, रात्री साडेनऊच्या सुमारास उत्तमनगर मधील आर आर वाईन्सवर (RR Wines Pune) अज्ञात 6 जणांनी गावठी पिस्टल (Pistol), कोयता (Koyta), तलवारीसह (Sword) धाडसी दरोडा (Daring Robbery) टाकुन 3 लाख 9 हजार रुपये रोख आणि 3 हजार 200 रुपयांच्या ब्लेंडर्स प्राईड (Blenders Pride) ब्रांडच्या दारुच्या बाटल्याची चोरी केली होती. या संपूर्ण दरोडयाचा थरार दुकानाचे सीसीटीव्हीत चित्रीत झाला होता. आर. आर. वाईन्स शॉपचे कामगार मनोज मोरे (Manoj More) यांनी याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती.

 

 

सदरील घटना घडत असताना त्या दरोडेखोरांनी धारदार हत्यारे आणि बंदुकीचा धाक दाखवल्याने दुकानातील कामगार स्वत:चा जीव वाचवण्यासाठी मागच्या दरवाजाने पळून गेले होते. दरम्यान उत्तमनगर पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन 2 स्वतंत्र तपासपथके तयार केली व आरोपीच्या शोधकामी रवाना केली होती. आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत पाहुन रेकॉडवरील गुन्हेगारांनी हा धाडसी दरोडा टाकला असावा, असा पोलीसाचा अदांज होता. त्यामुळे या घटनेचे सीसीटीव्हीचे फुटेज सर्व पोलीस स्टेशनच्या तपास पथकांना (Investigation Teams) पाठवण्यात आले होते. यावेळी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील (Sinhgad Road Detecton Branch) अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या दरोडेखोरांच्या हालचाली ओळखीच्या वाटल्या. त्यांनी ताबडतोड त्या संशयितांचा शोध घेत, त्यातील दोघांच्या मुसक्या आवळून, दोघांना उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

 

यानंतर उत्तमनगर पोलीस स्टेशन आणि सिहंगड रोड पोलीस स्टेशनच्या सयुंक्त तपासपथकाने (Joint Investigation) मंगळवार दि. 21 नोव्हेंबर 2023 रोजी धायरी (Dhayari), माणिकबाग (Manikbaugh), सिहंगड रोड भागातुन 5 संशयितांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करुन, त्यांनी गुन्हा करताना वापरलेला गावठी कटटा, लोखडी कोयता, तलवार, सत्तुर व चोरीस गेलेल्या एकुण 3 लाख 90 हजार रुपयांपैकी 32 हजार 800 रुपये रोख रक्कम जप्त करणेत यश आले. ताब्यात घेतलेले 5 पैकी 4 जण हे अल्पयीन (Juvenile) निष्पन्न झाल्याने, त्यांना बाल न्यायमंडळ येरवडा (Juvenile Court, Yerawada, Pune) येथे हजर करणेत आले असुन, तेजस राहुल पिंपळगावकर (वय 19 वर्षे रा. माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे(Tejas Rahul Pimpalgaonkar) याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, तपासकामी त्याला शनिवार दि. 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आली आहे.

 

 

सदरील कामगीरी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील (IPS Pravin Patil), परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) यांचे मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (PI Kiran Balwadkar), सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार (API Dadaraje Pawar), उमेश रोकडे (API Umesh Rokade), पोलीस अंमलदार समीर पवार (Sameer Pawar), तुषार किंन्द्रे (Tushar Kindre), ज्ञानेश्वर तोडकर (Dnyaneshwar Todkar), दत्तात्रय मालुसरे (Dattatray Malusare), प्रमोद कुमदकर (Pramod Kumadkar) यांच्यासह सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (PI Abhay Mahajan), पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar) यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam), पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesh Mokashi), पोलीस अंमलदार आबा उत्तेकर (Aba Uttekar), संजय शिंदे (Sanjay Shinde), राजु वेंगरे (Raju Vengare), राहुल ओलेकर (Rahul Olekar), शिवाजी क्षीरसागर (Shivaji Kshirsagar), देवा चव्हाण (Deva Chavan), सागर शेडगे (Sagar Shedage), विकास पांडोळे (Vikas Pandole), अमोल पाटील (Amol Patil), दक्ष पाटील (Daksha Patil), स्वप्नील मगर (Swapnil Magar), विकास बांदल (Vikas Bandal), अविनाश कोंडे (Avinash Konde) यांचे पथकाने केली.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.