Sinhagad police target those kidnappers who were arrested by Warje police from Aurangabad
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics,
Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 17 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रोडवरून (Sinhgad
Road) हडपसर’ला (Hadapsar) जाऊन परत येण्यासाठी लोकल ट्रिपचे बुकिंग (Local
Cab Booking) घेतलेल्या वारजे (Warje) मधील कॅबचालकाचे कॅब’सह अपहरण (Cab
Driver Kidnapped with Car) करून, त्यांची सुटका करण्यासाठी कॅबचालकाच्या कुटुंबियांकडे खंडणी
(Extortion)
मागणाऱ्या अपहरणकर्त्यांना औरंगाबाद मधून अटक करण्यात (Kidnappers
Arrested from Aurangabad) वारजे
पोलिसांना (Warje Police) यश आले होते.
अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांनी यापूर्वी अशाप्रकारचे अनेक गुन्हे केलेले असून (Wanted
Criminals), पुण्यातील अनेक पोलीस स्टेशनचे
अधिकारी कर्मचारी या संशयितांच्या मागावर असतानाच, वारजे पोलिसांनंतर आता सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhgad Road Police) त्यांना ताब्यात घेऊन, त्यांच्या पूर्वीच्या सर्व गुन्ह्यांची गोळाबेरीज करत
त्यांच्यावर मोक्काचा (MCOCA) ठोका टाकला
आहे.
वारजे मधील कॅबचालक असलेल्या 42 वर्षीय व्यक्तीस, सिंहगड रोड’वरून एका प्रवाशाला घेऊन हडपसर येथे जायचे आहे आणि तेथून परत यायचे
आहे, अशाप्रकारची लोकल ट्रीप शनिवार दि.14 ऑक्टोबर 2023 डी. जे. ट्रॅव्हल्स या पर्यटन कंपनीच्या (DJ Tours & Travels App) मध्यस्थीने मिळाली होती. त्यानुसार कॅबचालकाने मिळालेल्या पत्त्यावरून आपल्या
स्विफ्ट डिझायर क्र. MH 12 SF 2485 मधून प्रवाशांना घेऊन
हडपसरच्या दिशेने प्रस्थान केले. मात्र दरम्यानच्या काळात कॅबचालकाला मारहाण करून, त्याच्या कुटुंबियांकडून 10 हजार रुपयांची खंडणी मागत, अपहरणकर्त्यांनी चालकाला सासवड (Saswad) येथे नेले. यावेळी भयभीत
झालेल्या कॅबचालकाच्या कुटुंबीयांनी वारजे पोलीस स्टेशन (Warje Police
Station) मध्ये धाव घेत, मदत मागितली होती.
पैसे खात्यात आल्यानंतर अपहरणकर्त्यांनी टेंभूर्णी (Tembhurni) मधील एका पेट्रोल पंपावर (Petrol Pump in Tembhurni) कार्ड स्वाईप (Debit Card Swipe) करून 10 हजार रुपये काढून घेतले. याबाबतची माहिती मिळताच, पोलिसांचे पथक तिथे पोचले, मात्र तोपर्यंत त्यांनी
जागा बदलली होती. मात्र या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) मध्ये आरोपीचा चेहरा पोलिसांना मिळाला. त्यांनी त्या चेहऱ्याच्या व्यक्तीचा
शोध चालू केला असता, तो सिंहगड रोड पोलिसांना
हवा असलेला आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान पोलीस
त्यांचा शोध घेत असताना, त्यांचे लोकेशन औरंगाबाद (Aurangabad) येथे येत असल्याचे समोर आल्यानंतर, तत्काळ औरंगाबाद गुन्हे
शाखेच्या (Aurangabad Crime Branch) मदतीने, सिडको (CIDCO) येथे सापळा रचून गाडीसह अपहरणकर्त्यांच्या
मुसक्या आवळण्यात वारजे पोलिसांच्या पथकाला अखेर यश आले होते.
यानंतर वारजे माळवाडी पोलीसांनी कॅब चालकाची सुटका करत, त्यांच्या फिर्यादीवरून रेकॉर्डवरील आरोपी, अपहरणकर्ते सुनील लक्ष्मण
गवळी (वय 40 वर्ष, रा. धायरी फाटा, जयभवानी हॉटेल जवळ, धायरी, पुणे आणि धनंजय वस्ती, श्रावणधारा वसाहत, सर्व्हिस ज्ञान कॉलनी, कोथरूड, पुणे )
(Sunil Lakshman
Gawali) आणि शरद मोहन पंडित (वय 38 वर्ष, रा. मानस सरोवर, धायरी, पुणे, मूळ रा. गेवराई, बीड) (Sharad Mohan Pandit) यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. या
मधल्या काळात अपहरणकर्त्यांनी कॅब चालकाला यांच्या जीवाचे काही बरे वाईट तर केले
नसेल ना, ते सुरक्षित असतील ना याबाबत वारजे पोलिसांना चिंता सतावत होती. मात्र कॅब चालकाला
मारहाण करून, त्यांच्याजवळ बंदुक (Pistol) असल्याची बतावणी करून, त्या बंदुकीने गोळी मारून (Firing) जीव घेण्याची धमकी देत, अपहरणकर्ते फिरवत असल्याचे समोर आले आहे. यातील अपहरणकर्ते सुनील गवळी आणि शरद
पंडित यांनी असे अनेक गुन्हे केल्याचे समोर येत असून, ते या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचा शोध शहरातील अनेक पोलीस घेत
असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, 2 डिसेंबर 2021 रोजी टोळीप्रमुख सुनील गवळी याला 1 वर्षाकरिता सिंहगड
रोड पोलिसांनी स्थानबद्ध (Localised) देखील केले होते. मात्र त्याच्या वर्तणुकीत सुधारणा (Behavior Not Improve) झाली नाही. त्यानंतर आता
त्यांच्यावर सिंहगड रोड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली असून, सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार
पाटील (IPS Pravinkumar
Patil), परिमंडळ 3 चे पोलीस उप आयुक्त सुहेल
शर्मा (DCP Suhail Sharma), सिंहगड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale) यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सिंहगड रोड पोलीस
स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (PI Abhay Mahajan), पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत
राजुरकर (PI Jayant Rajurakar)
यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस
निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam) यांचेसह सर्व्हेलन्स पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश
मोकाशी (PSI Ganesh Mokashi), पोलीस अंमलदार स्मित चव्हाण (Smit Chavan), प्रथमेश गुरव (Prathamesh Gurav) यांनी केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे मार्गदर्शनाखाली
मकोका अंतर्गत केलेली ही 85 वी कारवाई आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share