Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
Two
arrested with 2 pistols, 3 live cartridges at
Nanded City Gate; Performance of Sinhagad Road Police
पुणे, दि. 25 नोव्हेंबर 2023
(चेकमेट
टाईम्स): सिंहगड रोड पोलीस
स्टेशन (Sinhgad Road
Police Station) हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना
आळा घालण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन
(PI Abhay Mahajan) याचे आदेशाने हद्दीमधील रेकॉर्डवरील आरोपी, तसेच
संशयीत इसम, घरफोडी (Burglary) व वाहन चोरीच्या
(Vehicle Theft) गुन्हयाना आळा घालण्यासाठी पोलिसांनी खाजगी वाहनावरुन
गस्त (Private Vehicle Patroling) सुरु केली आहे. यामध्ये
नांदेड सिटी (Nanded City) गेटजवळ दोन जणांना दोन गावठी
पिस्तुल (Pistol) आणि तीन काडतुसांसह (Cartridges) ताब्यात घेण्यात सिंहगड रोड
पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेतलेले दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर
सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
याबाबत सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, सहायक पोलीस फौजदार आबा उत्तेकर (ASI Aba Uttekar), पोलीस अंमलदार राहुल ओलेकर
(Rahul Olekar), शिवाजी क्षीरसागर (Shivaji Kshirsagar) हे सोमवार दि.20 नोव्हेंबर 2023 सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हद्दीत
गस्त घालत असताना, पोलीस रेकॉर्डवरील दोन आरोपी नांदेड सिटी गेटच्या बाजुस, सार्वजनिक
रोडच्या कडेला थांबलेले असून, त्यांच्याकडे पिस्तुल आहेत, अशी माहिती त्यांना त्यांच्या
खास बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीचे गांभीर्य ओळखून, आबा उत्तेकर आणि
सहकाऱ्यांनी तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API
Sachin Nikam) यांना ही माहिती कळवली असता, त्यांनी तत्काळ वरीष्ठ पोलीस
निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांना कळवली असता, वरिष्ठांनी सदर ठिकाणी जावुन खात्री
करुन पुढील योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), परीमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त सुहेल
शर्मा (DCP Suhail
Sharma), सिंहगड रोड विभागाचे
सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale), वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर
(PI Jayant Rajurkar) यांचे
मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesh Mokashi), सहायक पोलीस फौजदार आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे (Sanjay Shinde), राजु वेंगरे (Raju Vengare), राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण (Deva Chavan), सागर शेडगे (Sagar Shedage), विकास पांडोळे (Vikas
Pandole), अमोल पाटील (Amol Patil), दक्ष पाटील (Daksha Patil), स्वप्नील मगर (Swapnil
Magar), विकास बांदल (Vikas Bandal), अविनाश कोंडे (Avinash Konde) यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा लावला असता, त्यांना पोलीस
रेकॉर्डवरील आरोपी मन्या चोरघे व वैभव तरडे हे त्याठिकाणी थांबले असल्याचे दिसले.
यावेळी त्यांची व पोलिसांची नजरा नजर होताच ते दोघेही त्या ठिकाणावरुन नजर चुकवुन पळुन
जाण्याचा प्रयत्न करत असतानाच, माहिती मिळालेल्या क्षणापासून 20 मिनिटांच्या आत त्यांना
झडप घालून जेरबंद करण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश आले.
यावेळी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ 75
हजार रुपये किंमतीचे 2 गावठी पिस्टल आणि 1 हजार 500 रुपये किंमतीची 3 जिवंत काडतुसे
असा एकुण 76 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन,
मनोज ऊर्फ मन्या ऊर्फ शिवप्रसाद किसन चोरघे (Manoj alias Manya alias Shivprasad Kisan Chorghe) (वय
20, रा. पोकळे वस्ती, धायरेश्वर मंदीरामागे, धायरी, पुणे) आणि वैभव अनंता तरडे
(Vaibhav Ananta Tarde) (वय 23, रा. धायरेश्वर मंदीरामागे, धायरी,
पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, त्यांच्यावर मारामारी (Fight), खून (Murder), खुनाचा प्रयत्न करणे (Attempt
to Murder), हत्यारे दाखवून नागरिकांच्या मनात दहशत पसरवणे, कायदा
सुव्यवस्थेला बाधा आणणे, आर्म अॅकट (Arms Act) अशा कलमांखाली
सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक
सचिन निकम करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share