Type Here to Get Search Results !

शिवणे मध्ये दुकानात अज्ञात चोरट्यांनी केला हात साफ; जवळपास 3 लाखांचा मुद्देमाल लंपास

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Shops in Shivne were Burglary by unknown thieves; Almost 3 lakh worth of goods theft


 

Shops in Shivne were Burglary by unknown thieves; Almost 3 lakh worth of goods theft

 

पुणे, दि. 5 डिसेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station) हद्दीमधील शिवणे (Shivane) मध्ये असलेल्या एका इलेक्ट्रिकल सामानाचे रिटेल व होलसेल विक्रीचे (Electrical Shop) दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 7 हजार 420 रुपये किमतीचा ऐवज घरफोडी (Burglary) करून, चोरी करून नेला असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल तागुंदे (Rahul Tagunde) (वय 32, रा. खडकवाडी, मांडवी, पुणे) यांचे एनडीए रोड, शिवणे, पुणे येथील व्यंकटेश इलेक्ट्रिक (Venkatesh Electrics) हे इलेक्ट्रिकल सामानाचे रिटेल व होलसेल विक्रीचे दुकान गुरुवार दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 ते शुक्रवार दि.1 डिसेंबर 2023 रात्री 8.30 च्या दरम्यान कुलुप लावुन बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने दुकानाचे मागील बाजुचा लोखंडी पत्रा उघडुन, त्यावाटे आत मध्ये प्रवेश करुन, ड्रॉव्हर कशाचेतरी सहाय्याने उचकटुन, त्यामध्ये ठेवलेले 2 हजार 500 रूपये रोख रक्कम आणि पॉलीकॅब (Policab), टिव्ही केबल (TV Cable) व कॅटसिक्स कंपनीचे वायरचे बंडल (Cat 6 Wire Bundle) असा एकुण 3 लाख 7 हजार 420 रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून, चोरी करून नेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे (API Umesh Rokade) करत आहेत.

 


 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.