Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
Burning garbage and making smoke and again shouting that pollution has increased; What exactly is the game plan of the Pune Municipal Corporation
पुणे, दि. 5
डिसेंबर 2023
(चेकमेट
टाईम्स): एकीकडे प्रदूषण (Pollution) वाढलंय म्हणून आरडा ओरडा केला जात असताना, दुसरीकडे पुणे महानगरपालिकाच
कचरा पेटवून प्रदूषण (Pollution by Burning Garbage) करत
असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येते आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचा नेमका गेम
प्लॅन (PMC Pune Game Plan) काय आहे असा प्रश्न या
निमित्ताने उपस्थित होतो आहे. त्याला कारण देखील तेवढेच सक्षम असून, एकीकडे
प्रदूषण वाढल्याची ओरड सुरु झाली आणि लगेचच फॉगींग मशीनची (Fogging Machine) खरेदी पण झाली. त्यामुळे या मशीनची विक्री वाढवण्यासाठी तर प्रदूषणाचा
फार्स केला जात नाहीये ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
काही
वर्षांपूर्वी आलेला कोरोना (Covid / Corona) आणि त्यानंतर वेगाने उपलब्ध झालेल्या
लसी असतील की अनेक संसर्गजन्य रोग (Infectious Diseases)
असतील. शासनाचे शहरांमध्ये हेल्मेट सक्ती (Helmet Mandatory)
पासून सिट बेल्टच्या सक्तीपर्यंत (Seat Belt Mandatory)
सर्वच विषय करून, काही कंपन्यांची उत्पादने खपवण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचे
प्रकार होत असल्याच्या चर्चा सर्वत्र होताना दिसतात. मात्र त्याबाबत कोणी उघड उघड
बोलायला (Open Orguments) तयार होत नाही. कारण शासन, प्रशासन
सगळ्यांची ही मिलीभगत असल्याचा विश्वासच सामान्य नागरिकांना वाटू लागला आहे. “शासन,
प्रशासन आणि राजकारण यातील कोणीही सामान्य नागरिकांसाठी काम करतात” यावर आता
जनतेचा विश्वासच राहिलेला नाही. त्याची परिणीती मतदानाच्या घसरलेल्या टक्क्यावर
आणि शासन, प्रशासनाच्या योजनांमध्ये नागरिकांकडून होत असलेल्या असहकार्याच्या
भूमिकेतून स्पष्ट होताना दिसते.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share