Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
Chain Snatcher in warje police
custody; A blow was given to the woman's neck
पुणे, दि. 23 डिसेंबर 2023
(चेकमेट
टाईम्स): वारजे माळवाडी पोलीस स्टेशन (Warje Malwadi Police Station) हद्दीत
शनिवार दि. 9 डिसेंबर 2023 रोजी एका जेष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने
हिसका मारुन पळून गेलेल्या सराईत सोनसाळखी चोरास (Chain Snatcher) जेरबंद करण्यात वारजे पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून चोरी केलेला
मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. सदरील चोरट्याने यापूर्वी कोथरूड (Kothrud
Police Station) भागात देखील सोनसाखळी चोरी (Chain Snatching) केली असल्याचे समोर आले आहे.
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये
शनिवार दि. 9 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वाराणसी सोसायटी (Varanasi Society, Warje Malwadi), ऋतुविहार
बिल्डींगचे गेटसमोर, वारजे पुणे येथे काळ्या रंगाची दुचाकी अॅक्टीव्हा (Honda Activa) मोपेड
गाडीवर एक अज्ञात इसमाने त्याची ओळख लपवून येवुन त्याने जेष्ठ नागरीक महिला या शतपावली
(Evening Walk) करीत असताना त्यांचे गळ्यातील 8 ग्रॅम वजनाची सोन्याची
चेन (Gold Chain Thiev) पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने
हिसका मारुन चोरी करुन घेवुन गेला होता. यावेळी महिलेने दाखवलेल्या सावध
पवित्र्यामुळे चेन अर्धवट तुटून चोरट्याच्या हाती आली होती. याबाबत सदरील महिलेने
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती.
एकाच आठवड्यात वारजे परिसरात सोनसाखळी
चोरीची घडलेली दुसरी घटना असताना, सदरील संशयित चोरट्याने तोंडाला मास्क, गॉगल, टोपी
व जर्किग घातलेले असल्याने तसेच दुचाकीस नंबर प्लेट नसल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणने
वारजे पोलीसांचे समोर आव्हान (Challenge) होते. याबाबत वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (PI Sunil Jaitapurkar), पोलीस
निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) यांनी तपास
पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे (PSI Rameshwar Parve) यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणनेबाबत योग्य त्या सुचना देवून आरोपीचा शोध घेण्यास
आदेशीत केले होते. त्याअनुषांगाने सदर अनोळखी इसमाचा तपास हा तपास पथकातील अधिकारी
पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार (Pradip Shelar), हनुमंत
मासाळ (Hanumant
Masal), विजय भुरुक (Vijay Bhuruk), बंटी मोरे (Bunty More), श्रीकांत
भांगरे
(Shrikant Bhangare), अजय कामठे (Ajay Kamthe), अमोल सूतकर (Amol Sutkar) यांचे
पथक सिसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage of Chain Snatching)
आधारे शोध घेत असताना, सदरचा आरोप हा वाराणसी परीसरात एका ठिकाणी खाजगी कॅमेरामध्ये
कैद झाला. त्याचेकडे असलेल्या दुचाकीवर श्री स्वामी समर्थाचे (Shree Swami
Samartha Sticker) स्टिकर असल्याने फक तेवढीच ओळख त्याची होती.
या अनुषंगाने वारजे पोलिसांचे पथक
निरनिराळ्या रस्त्यावर खाजगी दुचाकीवरून शिवणे (Shivane), उत्तमनगर (Uttamnagar), खडकवासला (Khadakwasla), किरकीटवाडी (Kirkatwadi) या भागात
गस्त घालत (Patroling) शोध घेत असताना, संशयित आरोपी हा उत्तमनगर
भागातील एका खाजगी कॅमेरामध्ये विना मास्कचा कैद झाल्याचे दिसले. त्यामुळे सदर आरोपीचा
फोटो घेवून तपास करत असताना, तपास पथकाला त्यांचे गोपनीय बातमीदारांमार्फत
(Confidential Correspondent) "सदरचा सिसीटीव्ही फुटेजमधील आरोपी
हा शिंदे पुल (Shinde Pool Shivane) येथे त्याचेकडे असलेल्या
दुचाकी अॅक्टीव्हा मोपेड वर येवुन संशयीत रित्या थांबला आहे, त्याचे
गाडीवर श्री स्वामी समर्थींचे स्टिकर आहे" अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने दिलेल्या
बातमीवरुन सापळा लावून संशयिताला ताब्यात घेतले. यावेळी त्याने त्याचे नाव सचिन नथू
पोळ (वय 40 वर्षे, रा. आदेश
अपार्टमेंट, भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे) (Sachin Nathu Pol)
असे असल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन, वारजे पोलीस स्टेशनला आणून विश्वासात
घेऊन चौकशी केली असता, तो प्रथम उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवू लागला. त्यानंतर त्यास अधिक तपासकामी अटक करुन त्यास विश्वासात घेवून
त्याचेकडे अधिक तपास केला असता, त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून त्याचेकडून
गुन्ह्यात चोरीस गेलेली सोन्याची चैन जप्त करण्यात येवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
तसेच नमुद आरोपीवर कोथरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यापूर्वी सोनसाखळी चोरीचे गुन्हे
दाखल आहेत.
सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त
रितेश कुमार (CP
Ritesh Kumar), परिमंडळ 3 चे उपायुक्त सुहेल
शर्मा (DCP
SUhail Sharma), सहाय्यक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP
Bhimrao Tele), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, पोलीस निरीक्षक
(गुन्हे) अजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक
रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, हनुमंत
मासाळ, संतोष नांगरे, विजय भुरुक, बंटी
मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, अमोल
सूतकर, ज्ञानेश्वर गुजर (Dnyaneshwar Gujar) यांनी केली आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share