Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
Grab a woman's
neck in warje; Thieves who came on a two-wheeler Theft a gold chain
पुणे, दि. 5
डिसेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी
मधील अतुलनगर (Atul Nagar Warje Malwadi) चौकात पतीसोबत मॉर्निंग
वॉल्कला (Morning Walk) गेलेल्या महिलेच्या गळ्यातील
सोन्याची चेन काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी हिसका
मारून लांबवल्याची (Gold Chain Theft by Biker Thives)
धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत वारजे पोलिस स्टेशन (Warje Police
Station) मध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,
वारजे पोलिस तपास करत आहेत..
याबाबत
वारजे पोलिस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे (PSI Narendra
Mundhe) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि.2 डिसेंबर 2023 सकाळी सव्वा सहाच्या
सुमारास पती राधाकृष्ण पिल्ले (Radhakrishna Pilley)
यांच्यासह शिला पिल्ले (Shila Pilley) या वारजे हायवेवर नेहमीप्रमाणे
मॉर्निंग वॉल्कला गेल्या होत्या. यावेळी त्यांचे पती वेगाने डुक्कर खिंडीच्या
(Dukkar Khind Warje Kothrud) दिशेने चालत गेले असताना, शिला पिल्ले या अतुलनगर, विनायक हॉस्पिटल (Vinayak
Hospital Warje) समोरील हायवेच्या सर्व्हिस रस्त्याने (Highway
Service Road) चालत असताना, काळ्या रंगाच्या
दुचाकीवरून, हेल्मेट घातलेले दोघेजण त्याच्या जवळ आले आणि
त्यांना काही कळायच्या आत, पिल्ले यांच्या गळ्यातील सोन्याची
चेन हिसका मारून चोरून (Chain Snatching), ते डुक्कर
खिंडीच्या दिशेने वेगात पळून गेले. थंडीचे दिवस (Winter Days) असल्याने रस्त्यावर उजाडलेले नव्हते, त्यामुळे
पिल्ले यांनी आरडाओरडा करूनही, त्या चोरट्यांना कोणीही अडवू
शकले नही, कि त्यांच्या दुचाकीचा नंबर देखील मिळून आला नाही.
याबाबत
शिला राधाकृष्ण पिल्ले (Shila Radhakrishna Pilley) (वय.60, रा. पॉप्युलर नगर, वारजे माळवाडी, पुणे) यांनी वारजे पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. तर वारजे पोलिस
स्टेशनच्या तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे पुढील तपास करत आहेत.
गेल्या वर्षभरापासून अधिक काळ वारजे हायवेवरील चेन हिसकावून चोरी करण्याच्या
घटनांना आळा घालण्यात वारजे पोलिसांना यश आले होते. तर अलंकार पोलिस स्टेशनच्या
(Alankar Police Station) हद्दीत या घटना कमी अधिक फरकाने घडत होत्या.
मात्र आता पुन्हा चेन चोरट्यांनी (Chain Snatchers) डोके वर
काढले आहे काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून,
थंडीच्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी मॉर्निंग वॉल्कला बाहेर
पडणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share