Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
Corona Scam; Pre-arrest bail granted to medical officer in case registered in Warje
पुणे, दि. 1
डिसेंबर 2023
(चेकमेट
टाईम्स): वारजे (Warje) येथील पुणे
महानगरपालिकेच्या रुग्णालयातील (PMC Hospital Warje) कोरोना चाचणी
साहित्य (Covid 19 Testing Kit), तसेच अन्य वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान
केंद्र (Private Lab) चालकांना विक्री करून 80 ते 90 लाखांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणात तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती (Dr.
Ashish Bharati) यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश
एम. जी चव्हाण (Justice M. G. Chavan) यांनी डॉ. भारती यांचा
अंतरिम अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मंजूर केला आहे.
याबाबत डॉ सतीश कोळसुरे (Dr. Satish Kolsure) यांनी
न्यायालयात धाव घेत, डॉ भारती यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली
होती. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वारजे पोलीस स्टेशन (Warje
Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune
Municipal Corporation Corona Scam)
वारजे भागात पुणे महानगरपालिकेचे कै. अरविंद बारटक्के
रुग्णालय (Arvind
Bartakke Hospital) आहे. 2021 मध्ये कोरोना काळात बारटक्के रुग्णालयात
कोरोना चाचणी साहित्य, औषधे (Covid
Medicines), जंतुनाशक (Disinfectant), तसेच अन्य वैद्यकीय साहित्य पुरवण्यात आले होते.
बारटक्के रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा सुर्यकांत तारडे (Dr. Aruna Suryakant Tarde) व डॉ.
ऋषिकेश हनुमंत गार्डी (Dr. Hrishikesh Hanumant Gardi) यांनी
नागरिकांच्या कोरोना चाचणीबाबत (Covid Test) बनावट नोंदी केल्या.
नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली, असे भासवले. प्रत्यक्षात त्यांनी शासनाने उपलब्ध
करून दिलेल्या वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करून
80 ते 90 लाखांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत, याप्रकारातील तत्कालीन आरोग्य अधिकारी
डॉ. आशिष भारती यांनी दखल घेतली नसल्याच्या कारणावरून तिघांच्या विरोधात तक्रार करीत
तक्रारदार डॉ. सतीश कोळसुरे यांनी अॅड. नितीन नागरगोजे (Adv. Nitin Nagargoje) यांच्यामार्फत
न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश सी. एस.
पाटील (Judicial Magistrate C. S. Patil) यांनी वारजे पोलिसांनी
याचा सखोल तपास (Deep Investigation) करुन अहवाल सादर करावा असा
आदेश दिला होता. त्यानुसार वारजे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी डॉ आशिष भारती यांनी अॅड. विजयसिंह
ठोंबरे (Adv.
Vijaysinha Thombare) यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. भारती
यांनी कोणताही भ्रष्टाचार (Corruption) केलेला नसून, ते त्या
विभागाचे प्रमुख असल्याने त्यांचे नाव फिर्यादीमध्ये घेण्यात आले आहे. डॉ. तारडे यांनी
केलेल्या तक्रारीच्या वादातून, न्यायालयाची दिशाभूल (Court Misled) करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश घेतले गेले होते. डॉ आशिष भारती हे सरकारी
नोकर (Government Servant) असताना, त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल
करण्याचे आदेश हे सरकारची संमती असल्याशिवाय घेता येत नाही, असा युक्तिवाद बचावपक्षातर्फे अॅड. विजयसिह
ठोंबरे यांनी केला, त्यांना अॅड. विष्णू होगे
(Adv. Vishnu Hoge) यांनी सहकार्य केले. न्यायालयाने बचावपक्षाचा युक्तिवाद
मान्य करत, डॉ आशिष भारती यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे
तूर्तास तरी डॉ. आशिष भारती यांच्या डोक्यावरील अटकेची टांगती तलवार टळली आहे.
डॉ आशिष भारती
आणि वाद हे समीकरण का?
डॉ आशिष भारती यांच्या पत्नी डॉ. योगिता गोसावी (Dr. Hogita Gosavi) यांना पुणे महानगरपालिकेत
मानसोपचारतज्ञ (Psychiatrist) वर्ग 1 या
पदावर नोकरी देण्यात आली होती. मानसोपचारतज्ञ या पदासाठी 20 एप्रिल
2020 रोजी पुणे महानगरपालिकेने जाहिरात दिली होती. त्यानंतर 8
मार्च 2021 ला कर्मचारी निवड समितीची बैठक
झाली. ज्यावेळी आरोग्य प्रमुख म्हणून डॉ आशिष भारती महानगरपालिकेत रुजू झाले
होते. नंतर मुख्य सभेत 19 जुलै 2021 ला नियुक्तीचा प्रस्ताव
मान्य करण्यात आला आणि 30 ऑगस्ट 2021 ला डॉ आशिष भारती
यांच्या पत्नी (Wife of Dr. Ashish Bharati) डॉ योगिता
गोसावी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले होते. मात्र राज्य सरकारचे निर्देश
(Directives of State Govt) आहेत कि अधिकाऱ्याची पत्नी अथवा पती
किंवा जवळचे नातेवाईक त्यांच्या अधिपत्याखाली नियुक्त करू नयेत. त्यामुळे तेव्हा या
विषयावरून आरोपांची राळ उठली होती. तेव्हा त्यांच्या बदलीची मागणी देखील करण्यात
आली होती. यावेळी डॉ. आशिष हिरालाल भारती (Dr.
Ahish Hiralal Bharti) यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी तसाही दि.4
ऑक्टोबर 2021 रोजी संपुष्टात येणार होता. मात्र त्यांना पुन्हा एकदा 1 वर्षाची वाढ
देऊन, त्यांची बदली टाळली गेली होती. त्यामुळे डॉ आशिष भारती यांचे वरपर्यंत हात
असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share