Type Here to Get Search Results !

अग्निशमन दलाच्या सतर्कतेने वाचली इमारत; दोन सिलेंडरचे स्फोट वाचवत कौतुकास्पद कामगिरी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

The building was saved by the vigilance of the fire brigade; Admirable performance saving two cylinder detonations



The building was saved by the vigilance of the fire brigade; Admirable performance saving two cylinder detonations

 

पुणे, दि. 4 डिसेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): “वेळ आली होती, मात्र काळ आला नव्हता” या उक्तीला सार्थ करणारी घटना आज वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधून समोर आली आहे. एका बंद सदनिकेत आगीची (Locked Flat Fired) घटना घडली. याबाबत अग्निशमन दलाला (Warje Fire Brigade) कळवले गेले. अग्निशमन दल दाखल झाले, त्यांनी बंद घराचे कुलूप तोडले, घरात प्रवेश केला, आग विझवत, घरातील भरलेले दोन गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) वायुवेगाने बाहेर काढले, आतली आग विझवली. या घटनेत जर ते दोन सिलेंडर फुटले असते, तर त्या इमारतीचे काय झाले असते, याचा विचार न केलेलाच बरा.


 

 


याबाबत अग्निशमन दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वारजे माळवाडी मधील आदित्य गार्डन सिटी (Aditya Garden City) जवळील, आरएमडी कॉलेज (RMD College) मागे असलेल्या अंजनी (Anjani Apartment) नावाच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेतून धूर येत असल्याची माहिती एका व्यक्तीने अग्निशमन दलाला दिली होती. यावेळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाचे तांडेल राजेंद्र पायगुडे (Rajendra Paigude), जवान जयेश लबडे (Jayesh Labhade), निलेश तागुंदे (Nilesh Tagunde), मनोज गायकवाड (Manij Gaikwad), उमेश ताटे (Umesh Tate), किरण टूले (Kiran Tule), ड्रायव्हर सतीश डावरे (Satish Daware) यांना धूर येत असलेली सदनिका कुलूप लावून बंद असल्याचे दिसले. यावेळी अग्निशमन दलाने तत्काळ कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

 


 


यावेळी घरातील बाथरूम (Bathroom) मध्ये आग लागल्याची जवानांना दिसली. त्यांनी तत्काळ आगीवर पाण्याचा मारा करत आग विझवली. यामध्ये बाथरूम मधील वॉशिंग मशीन (Washing Machine) आणि गिझर (Water Geyser) जळलेला दिसून आला. दरम्यान बाथरूम बाहेर फ्रीज (Freeze) आणि त्याच्या शेजारी दोन गॅस सिलेंडर दिसत असल्याने, आग विझवत असतानाच, गॅस सिलेंडरला आग लागू नये म्हणून जवानांनी तत्काळ सिलेंडर बाहेर काढून खबरदारीचा उपाय (Precautionary Measure) अंमलात आणला. यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. सदरील इमारत जुनी असून, जर सिलेंडर फुटले असते, तर मोठी जीवित आणि वित्तहानी झाली असती, असा अंदाज उपस्थित नागरिकांनी वर्तवला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे कौतुक (Appreciation of Punctuality) होते आहे. शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने (Fire Brigade Pune) वर्तवला आहे. तर नागरिकांनी घरातून बाहेर जाताना विजेची सर्व उपकरणे व्यवस्थित बंद आहेत का, याची खात्री करूनच घराबाहेर पडावे असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.


 

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.