Type Here to Get Search Results !

उत्तमनगर पोलिसांचा दणका; एका अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए’ची कारवाई

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Uttamnagar police raid; MPDA's action against an inveterate criminal


 

Uttamnagar police Action; MPDA's action against an inveterate criminal

 

पुणे, दि. 6 डिसेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station) आणि बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या (Bundgarden Police Station) हद्दीत गुन्हेगारी कृत्य (Criminal Act) करून, दहशत निर्माण करत, समाज जीवनावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पुणे शहर पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कारवाई करत, त्याला एक वर्षाकरिता अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

 


 


आरोपी उत्तमनगर पोलीस स्टेशन आणि बंडगार्डन पोलीस पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनापरवाना पिस्तुल (Pistol), तलवार (Sword) बाळगून दहशत पसरवणे, धारदार हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder), दुखापत करणे, बेकायदा हत्यार बाळगणे (Arms Act), दंगा करणे (Riot), यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील 5 वर्षात त्याच्यावर 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेचे नुकसान (Loss of Life and Property of Citizens) होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

 


 


या पार्श्वभूमीवर उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (PI Kiran Balwadkar), गुन्हे शाखा, पीसीबी’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (PI Chandrakant Bedre), पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या आरोपी चेतन लक्ष्मण चव्हाण (Chetan Laxman Chavan) (वय 22, रा. इंगळे कॉलनी, शिवणे, ता. हवेली, पुणे) याच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्ध (Pune Police MPDA Action) करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांच्याकडे सादर केला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी चेतन चव्हाण याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये केलेली ही 66 वी स्थानबद्धतेची कारवाई आहे. (Pune Crime News)

 


 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.