Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
Appointment of Prerna Pushkar Tuljapurkar as Publicity Head of BJP Pune City Mahila Aghadi
पुणे, दि. 3 डिसेंबर 2023
(चेकमेट
टाईम्स): भारतीय जनता पार्टीच्या
पुणे शहर महिला आघाडीच्या (BJP Womens
Pune) प्रसिद्धी प्रमुखपदी (Publicity Head) प्रेरणा
पुष्कर तुळजापूरकर (Prerna Pushkar Tuljapurkar) यांची नियुक्ती
करण्यात आली. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा (Women State President of
BJP) चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि पुणे शहराध्यक्ष
(BJP Pune City President) धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा (BJP
Pune Womens President) हर्षदा फरांदे (Harshada Farande) यांच्या हस्ते तुळजापूरकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “तुळजापूरकर कुटुंब भारतीय जनता पार्टीला
समर्पित कुटुंब (Devoted Family
for BJP) आहे. प्रेरणा तुळजापूरकरच्या रूपाने आम्हाला एक सक्षम महिला
(Capable Woman) मिळाली आहे. पक्षाची विचारधारा समाजापर्यंत पोहोचविण्याचे
काम तुळजापूरकर या पुरेपूर करतील असा विश्वासही चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त
केला. याबाबत बोलताना प्रेरणा तुळजापूरकर म्हणाल्या की,
“पक्षाने दिलेली
जबाबदारी नक्कीच मोठी आहे. वरिष्ठांच्या विश्वासाला पात्र ठरवून, दिलेली जबाबदारी पार
पाडून समाजाला आणि पक्षाला अभिप्रेत असे काम करणार आहे”.
पुष्कर तुळजापूरकर (Pushkar Tuljapurkar) यांची
काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या पुणे शहर सहप्रचार व प्रसिद्धी प्रमुख (BJP Pune
City Co-Promotion and Publicity Head) म्हणून नियुक्ती करण्यात आली
आहे. भाजपाचे कट्टर कार्यकर्ते (BJP Radical Activists) म्हणून
पुष्कर तुळजापूरकर ओळखले जातात. त्यांची तब्बल 18 वर्षांपूर्वी पहिल्यांदा कसबा मतदारसंघाचा (Kasba Vidhanasabha) प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती
करण्यात आली होती. त्यानंतर इमानेतबारे एक एक टप्पा पार करत, तुळजापूरकर पुणे
शहराच्या पदापर्यंत पोचले आहेत. विशेष म्हणजे 18 वर्षांपूर्वी तुळजापूरकर यांची
कसब्यावर नियुक्ती झाली तेव्हा आणि आता पुणे शहरावर नियुक्ती झाली तेव्हाही
भाजपाचे कट्टर आणि अभ्यासू व्यक्तिमत्व पुण्याचे प्रभारी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
(BJP In-charge Maharashtra Pradesh Vice President) माधव भंडारी
(Madhav Bhandari) व्यासपीठावर उपस्थित होते, याचा आनंद असल्याचे
पुष्कर तुळजापूरकर अभिमानाने सांगतात.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share