Type Here to Get Search Results !

नागरिक त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करत होते; मात्र त्यांनी उडी मारलीच

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


A senior citizen commits suicide by jumping from the gallery of a building in kothrud


 


A senior citizen commits suicide by jumping from the gallery of a building

पुणे, दि. 4 डिसेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कोथरूड (Kothrud, Pune) भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे मधून निवृत्त (Railway Retired) झाल्यानंतर आजारपणात एकाकी जीवन जगणाऱ्या 89 वर्षीय ज्येष्ठाने रविवार दि.3 डिसेंबर 2023 दुपारच्या वेळेस दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा (Suicide of Senior Citizen) संपवली. या ज्येष्ठाला उडी मारण्यापासून खालील नागरिक परावृत्त करत होते. मात्र जीवनयात्रा संपवण्याचा दृढ निश्चय केलेल्या ज्येष्ठाने उडी मारून शारीरिक व्याधीतून कायमची सुटका करून घेतली.

 


 


मकरंद महादेव मेंगाळे (Makarand Mahadev Mengale) (वय 89, रा. मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मयत मकरंद मेंगाळे मयूर कॉलनीतील महादेव स्मृती अपार्टमेंट (Mahadev Smriti Apartment) मध्ये राहत होते. त्यांना तीन मुले आहेत. त्यातील दोन मुले नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाली (Settled in America) आहेत. तर तिसरा मुलगा मुंबईत (Mumbai) असतो. मयत मकरंद मेंगाळे यांच्या पत्नीचे निधन झाले असल्याने ते घरात एकटेच राहत होते. त्यांच्या सेवासुश्रुशेसाठी मुलांनी एक केअर टेकर (Care Taker) नियुक्त केलेला होता. त्याचबरोबर सीसीटीव्ही लावून वडिलांची सेवासुश्रुषा व्यवस्थित होते आहे का यावर पण ते लक्ष ठेऊन होते.


 

 


रविवारी दुपारी एकच्या सुमारास मेंगाळे यांच्याकरिता जेवणाचा डबा (Lunch Box) आणण्यासाठी केअर टेकर घरातून बाहेर पडला. यावेळी मेंगाळे वॉकर घेऊन सदनिकेतील गॅलरीत आले. गॅलरीतून ते उडी मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी इमारतीसमोर थांबलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला. नागरिकांनी मेंगाळे यांना उडी मारू नका, असे आर्जव करत आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, मेंगाळे यांनी गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केलीच (A senior citizen commits suicide by jumping from the gallery of a building). मयत मकरंद मेंगाळे यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा विकार (Blood Pressure and Diabetes) होता. त्यांना वृद्धापकाळामुळे आधाराशिवाय चालता देखील येत नव्हते. यामुळे आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या (Suicide due to illness) केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत कोथरूड पोलीस स्टेशन (kothrud Police Station) मध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असून, तपास चालू आहे.

 


 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.