Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
Why replaced good street lamp posts on Warje Road; Citizens suspected of Street Light Scam
पुणे, दि. 1
डिसेंबर 2023
(चेकमेट
टाईम्स): जी 20 च्या निमित्ताने चांगले रंगवलेले आणि सुस्थितीत असलेले वारजे, एनडीए रस्त्यावरील
पथदिव्यांचे खांब (NDA Road
Warje Street Light) बदलण्याचा सपाटा पुणे महानगरपालिकेने (PMC
Pune) सुरु केला असून, यामध्ये मोठा घोटाळा (Street Light
Scam) असल्याचा संशय स्थानिक नागरिक व्यक्त करू लागले आहेत. तर याची
चौकशी करून, नागरिकांच्या कररुपी पैशांची अशाप्रकारे उधळपट्टी करणाऱ्यांवर कारवाई
करण्याची मागणी होऊ लागली आहे. याबाबत शिवसेनेचे ज्ञानेश्वर बापू वांजळे (Dnyaneshwar
Wanjale) यांनी संताप व्यक्त केलाय, तर रासप’च्या उमेश कोकरे
(Umesh Kokare) यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.
पुणे महानगरपालिकेतील नगरसेवकांची (PMC Pune Corporators) सत्ता
संपुष्टात येऊन, अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली चालणारी प्रशासक (Administrator) संचालित महानगरपालिका सध्या काम करत आहे. मात्र यामध्ये अधिकाऱ्यांच्या
मनमानी कारभाराची (Arbitrary Administration) अनेक उदाहरणे
समोर आली असून, अनावश्यक खर्च (Unnecessary Expenses) वाढले
असल्याच्या तक्रारी नगरसेवक करत आहेत. याची अनेक उदाहरणे नागरिकांना देखील
अनुभवण्यास मिळत असून, जी 20 च्या निमित्ताने वारजे एनडीए रस्त्यावरील
पथदिव्यांच्या सर्व खांबांची रंगरंगोटी, दुरुस्ती (Painting,
Repairing) करण्यात आली होती. मात्र त्याला काही महिने उलटत नाही,
तोच आता हे सर्व खांब गॅस कटरने जाळून काढून, नवीन सदृश खांब (Polls Like New) बसवण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी यामागे घोटाळा (Scam) असण्याची शंका वर्तवली असून, या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई
करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.
नाही तिथे का बसवत नाहीत; ज्ञानेश्वर वांजळे
यांचा सवाल
वारजे एनडीए रस्त्यावरील पथदिव्याचे चांगले खांब बदलले
जात असल्याने शिवसेनेच्या (Shivsena)
ज्ञानेश्वर बापू वांजळे यांनी संताप व्यक्त केला असून, वारजे माळवाडीच्या (Warje
Malwadi) गोकुळनगर पठार (Gokulnagar Pathar),
सहयोग नगर पठार (Sahyog Nagar Pathar) सारख्या अनेक
भागांमध्ये पुणे महानगरपालिकेचे अत्यावश्यक असलेले पथदिवे अजिबातच नाहीत. काही भागांमध्ये
कमी प्रमाणात आणि लांब लांब पथदिवे आहेत. काही कमी प्रकाश देणारे आणि काही कायम
बंद असणारे पथदिवे आहेत. मात्र ते बदलण्याचे काम अनेकदा सांगूनही पालिकेकडून केले
जात नाही किंवा उशिरा केले जाते. त्यातही दर्जाचा प्रश्न असतोच. मात्र चांगले
असलेले पथदिवे काढून नवीन बसवण्याचे कारण समजत नसून, यामागचे गौडबंगाल शोधून
काढण्याची गरज ज्ञानेश्वर वांजळे यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना व्यक्त केली आहे.
अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने खोडसाळपणा; उमेश कोकरे
यांचा आरोप
पुणे महानगरपालिकेत समाविष्ठ झालेल्या शिवणे, उत्तमनगर,
कोंढवे धावडे, न्यू कोपरे (Shivne, Uttamnagar, Kondhve
Dhawade, New Kopare) या गावांमध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी,
कर्मचारी संगनमताने खोडसाळपणा (Collusive Mischief) करत
आहेत. या भागात जी 20 च्या निमित्ताने घाई घाई मध्ये पथदिव्यांचे काही खांब आणि
पथदिवे बसवण्यात आले होते, काही जुन्यांना नव्याने रंगवण्यात आले. मात्र काही खांब
रंगवले असताना, त्यावर दिवे मात्र लागले नाहीत. काही ठिकाणी दिवे आहेत ते
सातत्याने बंद असतात. दिवसा पथदिवे चालू आणि रात्री बंद हे चित्र तर नेहमीच
पाहायला मिळते. खडकवासला धरणासमोरील (Khadakwasla Dam) आणि
तिकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे अनेकदा बंद असतात. सध्या थंडीचे दिवस (Winter) चालू असल्याने उशिरा सूर्योदय होतो, अशावेळी सकाळी मोकळ्या हवेत फिरायला
जाणाऱ्यांना अंधारात चालावे लागते. त्यामुळे साप, विंचू आणि कुत्र्यांचे भय वाढल्याने
येथील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मात्र असे असताना पालिकेचे
अधिकारी कर्मचारी मुद्दामहून या समाविष्ठ गावांना सापत्नपणाची वागणूक (Misbehavior) देण्याचे दुष्कृत्य करत असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya
Samaj Paksha) पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोकरे यांनी केला आहे. तर
वारजे मध्ये चांगले खांब बदलले जात असतील तर आमच्या समाविष्ठ गावांमधील पथदिवे पण
चालू दिसले पाहिजेत, अन्यथा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अंधार (Protest) करू असा इशाराही कोकरे यांनी दिला आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share