Type Here to Get Search Results !

भाजपाच्या बूथ कमिट्यांवर मनसैनिकांना प्रशिक्षण; भविष्यातील युतीची नांदी?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Training of Mind Sainiks on BJP Booth Committees; The beginning of a future alliance?


Training to MNS Activist on BJP Booth Committees; The beginning of a future alliance?

 

पुणे, दि. 2 डिसेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): “मेरा बुथ, सबसे मजबुत” (Mera Buth, Sabse Majbut) चा नारा देत, भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) बूथ रचनेत (Booth Layouts) नेहमीच आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. आता देखील बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि विस्तारक नेमून देशभरात येऊ घातलेल्या लोकसभा आणि काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची (Upcoming Loksabha and Vidhansabha Elections) तयारी भाजपा कडून सुरु करण्यात आली आहे. त्याच जोरावर सध्या भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (BJP Maharashtra President) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) 51 टक्के मतांचा टप्पा भाजपा गाठेल असा विश्वास व्यक्त करताना दिसतात. मात्र भाजपाच्या या मिशनला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडूनच तिलांजली दिली जात आहे की त्यांचा हा नवीन प्रयोग (Experiment) आहे असा संभ्रम (Confusion) निर्माण झाला आहे. कारण पुण्यातील काही भागातील भाजपाच्या बूथ प्रमुख आणि बूथ समित्यांचे प्रशिक्षण काही विस्तारक (Expander) घेत असून, त्यामध्ये मनसैनिकांना (MNS Activist) देखील प्रशिक्षण (Training) दिले जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे भाजपा आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या (BJP & MNS Alliance Possiblities) तयारीचे आदेश आलेत काय? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

 


 


भाजपाने मंडल निहाय, प्रभाग निहाय, शक्तिकेंद्र निहाय, बूथ निहाय आणि बूथ समिती नियोजन करण्यासाठी पुणे शहरातील 8 मंडल, 60 प्रभागप्रमुख, 600 शक्तिकेंद्रप्रमुख, 3 हजार पेक्षा अधिक बूथप्रमुख आणि 30 हजार पेक्षा अधिक बूथसंपर्क कार्यकर्ते लाखो घरांना भेट देऊन मतदारांपर्यंत संपर्क साधण्याचे नियोजन केले होते. कोणत्याही स्थितीत लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह पुणे महानगरपालिकेवर (Pune Municipal Corporation) सत्ता पुन्हा मिळवायची असून, त्यासाठी संघटना मजबूत करणे (Strengthening Organizations) आणि प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक बुथवर जबाबदारी निश्चित करायची आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय 5 बुथमागे एका शक्ती केंद्र प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख हा मंडल अध्यक्षांइतकाच महत्त्वाचा असून, विस्तारक त्यांच्यावर लक्ष ठेवतील आणि पक्षाला अपडेट करतील असे मजबूत नियोजन भाजपने (Strong Planning of BJP) केले आहे.


 

 


मात्र आता भाजपने नवीन खेळी (New Political Game) चालू केली आहे की पदाधिकारी कार्यकर्त्यांनीच संभाव्य मनसे बरोबरच्या युतीची तयारी चालू आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, याबाबत नेमका काय खुलासा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र असे असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आपल्या परीने काम चालू केले असून, ते कोणत्याही युती पेक्षा स्वबळावर भाजपाचे अधिकाधिक उमेदवार निवडून येण्यासाठी काम करत आहेत. संघ आपल्या परीने चांगल्यात चांगले काम करत असून, त्यांना राजकारणाशी काहीही घेणे देणे नाही असे असते. त्यामुळे आता भाजपाची रणनीती (BJP's Strategy) कशी असेल याकडे राजकीय अभ्यासकांचे (Political Analyst) डोळे लागले आहेत. त्याचवेळी युती झाली नाही तर दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजपाची रणनीती समजून ती भाजपा’वर उलटवली गेल्यास त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

 


 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.