Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
Development of
Khadakwasla now in the hands of Nana? Whose candidacy will be cut??
पुणे, दि. 29
डिसेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): मागच्या
काही दिवसांपासून माध्यमांमधून नाम फौंडेशनच्या (NAAM Faundation)
माध्यमातून मोठे काम करणारे आणि नेहमी कोणत्या न कोणत्या कारणास्तव चर्चेत असणारे
सिनेअभिनेते नाना पाटेकर उर्फ विश्वनाथ दिनकरराव पाटेकर (Nana
Patekar) हे खडकवासला विधानसभेची निवडणूक (Khadakwasla Vidhansabha Election) लढवणार
म्हणून वावटळ उठली आहे. मात्र हि वावटळ राजकारणासाठी नव्हे तर सिनेमाच्या
प्रसिद्धीसाठी चालली असावी असा प्राथमिक अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.
मात्र याबाबत नाना उर्फ विश्वनाथ पाटेकर यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप
समोर आलेली नसल्याने यावर नाना काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
त्याचवेळी नाना पाटेकर असो किंवा नसो “नाना” खडकवासल्याच्या मैदानात असणार अशाही
चर्चांना उधान आले आहे.
1 जानेवारी 1951
रोजी रायगड जिल्ह्यात जन्म झालेले नाना उर्फ विश्वनाथ पाटेकर असे अभिनेते आहेत ज्यांनी फक्त आपल्या
आवाजाच्या आणि संवाद फेकीच्या कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान
मिळवले. नानांना त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात
आले. इतर अभिनेत्यांसारखा रेखीव चेहरा नसताना देखील फक्त अभिनयाच्या जोरावर ते
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) आणि
फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) विजेते
ठरले. प्रत्येक वयातील प्रेक्षक हा नानांचा चाहता आहे. त्यांना सर्वजण नाना
म्हणूनच सर्वजण ओळखतात. असे असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये नानांनी नाम
फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे नाना आणि मकरंद अनासपुरे (Makarand
Anaspure) हि जोडी सामान्य शेतकऱ्यांच्या, गावखेड्यातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत
झाली आहे.
नाना उर्फ
विश्वनाथ पाटेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) कौतुक केले
होते. मोदींच्या समोर सध्या कुणीच नसल्याचे त्यांनी विधान केले होते. याशिवाय यापूर्वी
गणपती दर्शनाला गेलेल्या अजित पवारांकडेही (DCM Ajit Pawar) नाना
पाटेकर यांनी खडकवासल्यातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशा प्रकारचे दाखले
देत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाकडून नाना निवडणूक लढवतील, असा अंदाज
सूत्रांच्या हवाल्याने वर्तवण्यात आला आहे. मात्र यावर प्रत्यक्ष नाना पाटेकर
यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नही किंवा याबाबत कोणाकडेही खात्रीलायक
वृत्त नाही. असे असले तरी, नाना पाटेकर यांनी दोन वर्षांपूर्वी खडकवासला विधानसभा
मतदार संघात असलेल्या बहुली गावामध्ये (Bahuli Village) काही घरांना लागलेल्या
आगीनंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करत, त्यांना घरे बांधून देण्यात मदत केली होती.
नानांचा फार्म हाउस (Farm House of Nana Patekar) देखील खडकवासला
विधानसभा मतदार संघात आहे. मात्र म्हणून “पद्मश्री” (Padmashree) सारखी मोठी
पदवी मिळवलेला अभिनेता लोकमताच्या (Electon) परीक्षेला सामोरा जाईल
असे अजिबात वाटत नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. त्याचवेळी नाना पाटेकर यांना
विधानपरिषद (Vidhan Parishad) अथवा राज्यसभेची (Rajya Sabha) जागा सहज
मिळू शकते असा विश्वास व्यक्त करताना, नानांचा स्वभाव कोणत्याही एका पक्षाच्या
वळचणीला जाण्याचा नसल्याचेही राजकीय विश्लेषक सांगतात.
एकूणच नाना पाटेकर खडकवासला विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात असतील किंवा
नसतील हे येणारा काळच ठरवेल. त्याचवेळी दुसरे एक “नाना” खडकवासला विधानसभा मतदार
संघाच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांना नाना म्हणूनच
ओळखले जात असले तरी त्यांचे नाव “विकास पंढरीनाथ दांगट” (Vikas Pandharinath Dangat) असे आहे. ते
मागच्या दोन वर्षात झालेल्या ‘पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ (Pune District Central Cooperative Bank) आणि ‘कृषि उत्पन्न बाजार समिती’च्या (Agricultural
Produce Market Committee Pune) दोन्ही निवडणुकांमध्ये राजकीय
डावपेच यशस्वी करत निवडून आले आहेत. त्यांचे
एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे प्रदेश प्रतिनिधी म्हणून
फादर बॉडीच्या यादीत नाव आहे. तर दुसरीकडे त्यांनी ‘कृषि
उत्पन्न बाजार समिती’च्या निवडणुकीत भाजपशी जवळीक करून निवडणूक लढवून विजयश्री
खेचून आणली आहे. त्यातच त्यांनी मागच्या दोन वर्षात खडकवासला मतदार संघात वावर
वाढवला असल्याचे दिसत असून, दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणारे “विकासपर्व” (Vikasparva) हा
शब्द अधोरेखित करणारे आणि त्याचवेळी त्यावरील हिंदुत्ववादी (Hinduism) आणि धर्म निरपेक्ष (Secular) अशा दोन्ही
विचारांच्या महापुरुषांची छायाचित्रे असलेले, मात्र कोणत्याही पक्षाचे
प्रतिनिधित्व न करणारे फलक चर्चा घडवून गेले आहेत. नव्हे तर राजकीय विश्लेषकांना
देखील या फलकांनी बुचकळ्यात पाडले आहे.
मात्र
हे फलक आगामी विधानसभेची तयारी असल्याचा अंदाज सगळ्यांना आला असून, नाना उर्फ विकास
दांगट (Vikas Nana Dangat) यांच्या सुरु असलेल्या
गाठीभेटी त्या ठळकपणे मांडत आहेत. विकास दांगट यांनी 2009 साली खडकवासला विधानसभा
मतदार संघ निर्माण झाल्यानंतर येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या (Nationalist
Congress Party) उमेदवारीवर निवडणूक लढवली असून, तेव्हा त्यांना 56
हजार 488 मते मिळाली होती, जी एकूण झालेल्या मतदानापैकी 32.1 टक्के होती. त्यावेळी
त्यांच्यासमोर मनसे’चे (Maharashtra Navnirman Sena) गळाभर
सोने अंगावर घेऊन वावरणारे गोल्डन मॅन (Goldan Man), हजारो
नागरिकांना कशी दर्शन घडवणारे श्रावणबाळ (Shravanabal)
म्हणून प्रसिद्धी मिळवलेले रमेश वांजळे (Ramesh Wanjale) आणि
भाजपाचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) असे दुहेरी आव्हान
होते. तेव्हा महाराष्ट्रात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची लाट होती आणि
भाजपाची खडकवासल्यात तेवढी ताकद नव्हती. मात्र दांगट, वांजळे आणि मोहोळ तिघांचेही
मोठे नातेगोते खडकवासला मतदार संघात आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असे वाटत
असताना, वांजळे तब्बल 22 हजार 518 मतांच्या मोठ्या फरकाने 44.9 टक्के मते घेत
विजयी झाले होते. तर मुरलीधर मोहोळ यांना 29 हजार 171 म्हणजे एकूण झालेल्या
मतदानापैकी 16.6 टक्के मते मिळवता आली होती.
त्यानंतर
मात्र आता शेवटच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या भिमराव तापकीर (Bhimrao
Tapkir) यांना 1 लाख 20 हजार 518 मते मिळवता आली, जी झालेल्या एकूण
मतदानापैकी 48.8 टक्के होती. तर त्यांना कडवी झुंज दिलेल्या राष्ट्रवादीच्या सचिन
दोडके (Sachin Dodke) यांनी 1 लाख 17 हजार 923 मते मिळवली
होती, जी झालेल्या एकूण मतदानापैकी 47.8 टक्के होती. एकूणच फक्त 1 टक्क्याची तफावत
विजयी आणि पराभूत उमेदवारात उरली होती. त्यामुळे आता येऊ घातलेल्या 2024 च्या
खडकवासला विधानसभेच्या निवडणुकीत जर नाना उर्फ विकास दांगट यांनी लढायचे ठरवले तर ते
कोणत्या पक्षातून लढणार किंवा त्यांना कोणता पक्ष उमेदवारी देणार असा प्रश्न या
निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्याला कारण देखील तेवढेच स्पष्ट आहे. जसे कि आपण वर
वाचले आहे कि त्यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पद असल्याचे यादीत दिसते.
त्याचवेळी त्यांनी भाजपशी जवळीक करून बाजार समितीची विजयश्री खेचून आणली आहे.
त्यात आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गटाची युती
आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
(Chandrashekhar Bawankule) यांनी खडकवासल्यात झालेल्या टिफिन
बैठकीत “भाजपा मध्ये कोणाचीही उमेदवारी कधीही कट होऊ शकते” असे सूचक वक्तव्य केले
होते.
एकूणच
या विधानाचा संदर्भ घेऊन, नाना पाटेकर नव्हे तर नाना दांगट खडकवासल्याचे उमेदवार
असतील याच चर्चांना अधिक उधान आले असून, फक्त ते कोणत्या पक्षाचे यावरचा पडदा उठणे
बाकी आहे. तो पुढील काही महिन्यात उठेल अशी खात्री राजकीय विश्लेषकांना (Political
Analyst) आहे. फक्त खडकवासला विधानसभा मतदार संघ युतीतील तीन
पक्षांपैकी कोणत्या पक्षाला सुटतो. ज्याचा विद्यमान आमदार त्याच पक्षाचा तेथे
उमेदवार हे समीकरण बसते कि अजित पवारांना हवा असलेला खडकवासला मिळवण्यात ते यशस्वी
ठरतात, शिवाय एकनाथ शिंदे गटाचा तिसरा रमेश कोंडे (Ramesh Konde) हा उमेदवार देखील आयत्यावेळी इच्छुक होऊ शकतो. त्यामुळे खडकवासला कोणाचा
यावर तिन्ही पक्षांमध्येच घमासान होण्याचे चिन्ह असून, त्यांच्यातील वाटाघाटी
नंतरच काय ते चित्र स्पष्ट होईल असे दिसते. यामध्ये बंडखोरी रोखण्याचे आव्हान
देखील तिन्ही पक्षांसमोर असू शकते. त्यामुळे आगामी खडकवासल्याच्या निवडणुकीकडे
नाना पाटेकरचे नाव आले म्हणून नव्हे तर तिन्ही पक्षामधील संभाव्य रस्सीखेचीमुळे
महाराष्ट्राचे लक्ष लागले नाही तर नवल. तोपर्यंत नवीन वर्षाचा पहिला दिवस अर्थात 1
जानेवारीला असलेल्या नाना म्हणजे नाना पाटेकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त चेकमेट
परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! (Birthday Wishes to Nana Patekar)
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share