Type Here to Get Search Results !

भाजपा शहर कार्यालयाचा पत्ता पुन्हा बदलला; अध्यक्ष बदलानंतर कार्यालय बदलाचा नवा पायंडा पडतोय

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Address of BJP city office changed again; Now new office in Kothrud

 


Address of BJP city office changed again; Now new office in Kothrud

 

पुणे, दि. 3 जानेवारी 2024 (चेकमेट टाईम्स): पुणे शहर भाजपाच्या (BJP Pune) शहर कार्यालयाचा पत्ता पुन्हा एकदा बदलण्यात आला असून, आता कोथरूड (Kothrud) मध्ये म्हात्रे पुलाजवळील डी.पी. रस्त्यावर (DP Road, Mhatre Bridge) नवे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे (BJP Pune City President Dheeraj Ghate) यांनी आज पत्रकार परिषदेत (Press Conference) दिली. त्यामुळे अध्यक्ष बदलापाठोपाठ आता कार्यालयाच्या जागा (BJP Office Adress Pune) बदलाचा नवा पायंडा भाजपने सुरु केला आहे की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

 


 


पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी मंदिराच्या (Jogeshwari Temple Pune) शेजारी असलेल्या भिडे वाड्यातील (Bhide Wada) एका छोट्या खोलीत 1983 साली सुरू झालेल्या कार्यालयातच 2017 पर्यंत पुणे शहर भाजपाचे सर्व कामकाज चालू होते. तत्कालीन अध्यक्ष योगेश गोगावले (Yogesh Gogawale) यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत 2016 मध्ये जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान (Hotel Sanman, J. M. Road, Pune) येथे मध्यवर्ती कार्यालय हलविण्यात आले. परंतु ती ही जागा अपुरी पडू लागल्याने गोगावले यांच्यानंतर अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी पुणे महानगरपालिका भवनाच्या (PMC Pune) जवळील जागेत 3 डिसेंबर 2021 रोजी पुन्हा एकदा कार्यालय स्थलांतरित केले. तर आता पुन्हा शहर अध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती झाल्यानंतर 7 जानेवारी 2024 ला म्हात्रे पूल डीपी रस्त्यावर नव्याने कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. कोथरूड मधील कर्वे पुतळ्याच्या (Karve Statue) एकाच चौकात 100 मीटर अंतरात असलेली 3 कार्यालये आणि आता हे डीपी रस्त्यावरील कार्यालय मिळून कोथरूड मधील भाजपाचे चौथे मोठे कार्यालय असणार आहे.

 


 


नूतन कार्यालयाच्या शुभारंभाच्या निमित्ताने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारिता, प्रशासन आदी क्षेत्रांतील मान्यवरांना येत्या रविवार दि.7 जानेवारी 2024 दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत स्नेहमेळाव्यासाठी शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या माध्यमातून निमंत्रित करण्यात आले आहे. या स्नेहमिलानासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या नूतन कार्यालयात एक मोठे सभागृह, अध्यक्षीय दालन, पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने, कॉन्फरन्स रूम, वॉर रूम यांची व्यवस्था केलेली असल्याचे धीरज घाटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वागत कक्ष आणि पुरेशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. वर्तमान युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे असल्याने आणि माहितीचे आदान-प्रदान सुलभ व्हावे, प्रभावी जनसंपर्क (Effective Public Relations) करता या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान (Advanced Technology) वापरून यंत्रणा उभारण्यात आली असल्याचे घाटे यांनी सांगितले.

 


 


काळाच्या ओघात भाजपाच्या कामाची व्याप्ती सतत वाढत गेल्याने पुणे मनपा जवळील कार्यालय अजून मोठ्या जागेत आणि पार्किंग व्यवस्था मुबलक असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे शहराचे मध्यवर्ती कार्यालय नव्या वास्तूत स्थलांतरीत करीत आहोत, अशी माहिती घाटे यांनी दिली.

 


 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.