Type Here to Get Search Results !

बांधकाम कारवाईत अडथळा आणणाऱ्या 9 जणांवर वारजे पोलिसात गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


A case has been filed against 9 people in new ahiregaon who obstructed the construction work in Warje police

A case has been filed against 9 people in new ahiregaon who obstructed the construction work in Warje police 

 

पुणे, दि. 18 जानेवारी 2024 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी पोलीस स्टेशन (Warje Malwadi Police Station) हद्दीतील न्यू अहिरेगाव (New Ahiregaon) येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई (Action on Unauthorized Construction) करण्यास आलेल्या पथकाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून, रस्त्यात गाड्या आडव्या लावून, कारवाई करण्यास विरोध केल्याप्रकरणी, सरकारी कामात अडथळा (Obstruction of Government Work) आणल्याचा गुन्हा पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) वतीने दाखल करण्यात आला आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय जगताप (वय 55 वर्षे, रा. गणेशकुंज, मोहननगर, धनकवडी, पुणे) (Dattatray Jagtap) यांनी एकुण 9 इसमांविरोधात वारजे पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादी दत्तात्रय जगताप हे पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभागात (PMC Pune Construction Development Department) शाखा अभियंता (Branch Engineer) म्हणून काम पाहतात. त्यांचे विभागाकडुन नवीन बांधकाम मंजुरी (Construction Permission), अशी कामे केली जातात. बुधवार दि. 17 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 ते 2 वाजेच्या दरम्यान न्यू अहिरेगाव येथील सर्व्हे नं.76/87 पैकी प्लॉट नं.103 येथे अनधिकृत नवीन इमारतीचे बांधकाम चालु असताना, त्यास नोटीस देवुन सदरच्या नोटीस नमुद इसम यांनी न स्विकारता फिर्यादी व त्यांचे सहकारी सदर ठिकाणी कारवाई करण्याकरीता गेले असता नमुद इसमांनी त्यांच्या चारचाकी गाड्या रस्त्यात आडव्या लावुन, रस्ता बंद करुन, लोकांना जमा करुन, फिर्यादी यांना शिवीगाळ करुन, त्यांना धमकी देवून, फिर्यादी हे करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहिते (API Mohite) करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.