Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 12 जानेवारी 2024 (चेकमेट टाईम्स): उत्तमनगर
पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station) हद्दीत दहशत माजवणाऱ्या अट्टल
गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये (MPDA Act) कारवाई
करण्यात आली असून, त्याला नागपुर मध्यवर्ती कारागृह (Nagpur Central Jail) येथे 1 वर्षाकरीता स्थानबध्द (Positional) करण्याचे
आदेश पारीत करण्यात आले आहेत. याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक किरण बालवडकर (PI Kiran Balwadkar) यांनी प्रस्ताव
सादर केला होता. त्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh
Kumar) यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत त्यांच्या कारकीर्दीमधील 82
वी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस आयुक्तालयातील उत्तमनगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये
गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम (वय 23 वर्षे, रा. शांतीबन सोसायटी, शिवणे, पुणे)
(Prasanna Alias Bala Manoj Kadam) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे.
त्याने साथीदारांसह उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तलवार, लोखंडी कोयते, लाकडी दांडके या सारख्या जीवघेण्या घातक
हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder), गंभीर दुखापत,
दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे (Arms Act) यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील 5 वर्षामध्ये त्याचेविरूध्द
5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक
सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान
होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
यानंतर हद्दीतील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्तमनगर पोलीस
स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी पी.सी.बी. गुन्हे शाखा (PCB Crime
Branch), पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे
(PI Chandrakant Bedare) यांच्या माध्यमातून एम.पी.डी.ए. कायद्यान्वये
(Maharashtra Prevention of Dangerous Activities Act) स्थानबध्दतेचे
प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे सादर केले होते. त्यानुसार
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन नमूद इसमास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये
नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे 1 वर्षाकरीता स्थानबध्दतेचे
आदेश पारीत केले आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे
धोरण अवलंबिले आहे. त्यांनी दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए.
कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या 82 कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे
कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share