Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 21
जानेवारी 2024 (चेकमेट टाईम्स): आयोध्येमधील मंदिरात प्रभू
श्रीरामांची मूर्ती विराजमान झाली आहे. त्याची प्राणप्रतिष्ठापना सोमवार दि.22
जानेवारी 2024 रोजी होणार आहे. याबाबत देशवासियांमध्ये प्रचंड उत्साह असून,
सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. त्यात “पुणे तिथे काय उणे” या उक्तीला
सार्थ करणारा उपक्रम महाराष्ट्रातील सर्वात मोठा दीपोत्सव पुण्यात साजरा केला
जाणार आहे. यामध्ये प्रभू श्रीरामांची छबी दिव्यांच्या माध्यमातून साकारली जाणार
आहे. यावेळी तब्बल 1 हजारांहून अधिक राम भक्तांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात
येणार आहे. त्यामुळे हे देशातील एक वेगळे रेकॉर्ड असेल असा दावा आयोजक भारतभूषण
बराटे यांनी केला आहे.
सोमवार
दि.22 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात
येणार आहे. यामध्ये तब्बल 60 फुट रुंद आणि 100 फुट लांबीची प्रभू श्रीरामांची छबी
22 हजार पणत्यांच्या सहाय्याने आरएमडी कॉलेजच्या मैदानावर साकारण्यात येणार आहे.
तर या पणत्या उपस्थितांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात येणार असून, तब्बल 1
हजारांहून अधिक राम भक्तांना एकाचवेळी स्वतंत्र आरतीची ताटे देऊन, त्यांच्या हस्ते
प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व उपस्थितांना लाडू
वाटून आनंदोत्सव देखील साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सहकुटुंब,
सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि भारतभूषण बराटे
यांनी केले आहे.
या
सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रंग बदललेल्या याच शब्दरचनेवर क्लिक करा आणि आपली
नोंदणी करा !
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share