Type Here to Get Search Results !

खुनाच्या घटनेने कर्वेनगर हादरलं; नवीन वर्षाची सुरुवात खुनाच्या घटनेने

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


The incident of murder in Karvenagar; The new year 2024 begins with a murder incident
याच ठिकाणी घडली खुनाची घटना

 

The incident of murder in Karvenagar; The new year begins with a murder incident

 

पुणे, दि. 2 जानेवारी 2024 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी पोलीस स्टेशन (Warje Malwadi Police Station) हद्दीची मंगळवार दि. 2 जानेवारी 2024 ची सकाळ खुनाच्या घटनेने उजाडली. भल्या सकाळी कर्वेनगर मध्ये खुनाची घटना (Murder in Karvenagar) घडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि कर्वेनगर (Karve Nagar) मध्ये एकाच चर्चांना उधाण आले. मात्र जेवढ्या वेगात खुनाच्या घटनेची माहिती पसरली त्यापेक्षा अधिक वेगात वारजे पोलीस स्टेशनचे पथक संशयित आरोपीच्या शोधार्थ बाहेर पडले आणि पळून जात असताना आरोपीला सोलापूर रस्त्यावर (Solapur Road) पाच तासांच्या आत पकडण्यात वारजे पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे.

 


 


याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा लखन कांबळे (वय 27, रा. संभानगर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, पुणे) (Pooja Lakhan Kambale) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, तिचा पती लखन बालाजी कांबळे (वय. 30 रा. संभानगर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, पुणे) (Lakhan Balaji Kambale) याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. लखन कांबळे याने पत्नी पुजा हिचा आज मंगळवार दि. 2 जानेवारी 2024 सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास डोक्यात कुऱ्हाडीने वार करून निघृण खून केला (Murder using AXE). यानंतर दुचाकी घेऊन सोलापूरच्या दिशेने पळून गेला. याबाबत माहिती मिळताच, कोथरूड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele), वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (PI Sunil Jaitapurkar), पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni), पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी (PSI Chandrakant Jawalgi), पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव (PSI Snehal Jadhav) यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

 


 


यावेळी कोथरूड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे, वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी यांनी तपास पथकाला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार वारजे पोलिसांच्या तपास पथकाने तत्काळ तपासाचे सूत्रे फिरवली असता, संशयित लखन कांबळे हा उस्मानाबाद (Osmanabad) या त्याच्या मूळ गावी दुचाकीवरून सोलापूर रस्त्याने जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे (PSI Rameshwar Parve), पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ (Hanumant Masal), श्रीकांत भांगरे (Shrikant Bhangare) यांच्या पथकाने तत्काळ सोलापूर रस्त्याने धाव घेत, त्याला जिल्हा हद्दीबाहेर जाण्यापूर्वीच रस्त्यात गाठत ताब्यात घेतले. यावेळी त्याने पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव सांगत, गुन्ह्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. एकूणच अनुभवी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी फिरवलेल्या वेगवान तपास चक्रामुळे खून करून फरार होणाऱ्या संशयिताला खुनाची घटना घडल्यानंतर 5 तास होण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात यश आले आहे.

 


 


सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लखन कांबळे हा पत्नी पुजा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून आज सकाळी त्यांची भांडणे झाली आणि त्यातच लखन याने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून पळून गेला. यामध्ये ती जागीच गतप्राण झाल्याची माहिती समोर आली असून, तिला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. लखन हा पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) आरोग्य विभागात ठेकेदारी पद्धतीने काम करत असल्याची माहिती समोर आली असून, तो सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय (Sinhgad Road Ward Office) हद्दीमधील धायरी (Dhayari) आरोग्य कोठी येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 


 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.