Warje Damini Marshall Showed Off To The Raiders; Taporigiri was done near schools
पुणे, दि. 11
जानेवारी 2024 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Schools in Warje
Malwadi) मधील काही शाळांपाशी टवाळखोर मुले शाळा भरण्याच्या आणि
सुटण्याच्या वेळेस जमा होतात आणि मुलींची छेड काढतात अशा प्रकारच्या तक्रारी
प्राप्त झाल्यानंतर (Complaints of Teasing to Girls) वारजे
पोलिस स्टेशनच्या दामिनी मार्शल्सने (Damini Marshall Warje Police Station) शाळा परिसरात गस्त (Patrolling Near School Premises) वाढवत काही टवाळखोरांना पकडून त्यांना चांगलाच हिसका दाखवला. यामुळे शाळा
परिसरातील टवाळखोरीला काही प्रमाणात आळा बसला आहे.
परिमंडळ 3
चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam), कोथरूड विभागाचे
सहायक पोलिस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele), वारजे पोलिस स्टेशनचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापुरकर (PI Sunil Jaitapurkar), पोलिस
निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) यांच्या
मार्गदर्शनाखाली दामिनी मार्शलच्या सायली
शेवाळे (LPC Sayali Shewale), विद्या
साळवे (LPC Vidhya Salve), साधना भोसले (LPC
Sadhana Bhosale) यांनी हि कारवाई केली असून, यानंतर पालकांनी आनंद व्यक्त केलाय. विशेष
म्हणजे या महिला पोलिसांचे कौतुक (Appreciation) करण्यात महिला पालक (Female Parents) अधिक
असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित महिला पालकांनी आपली चिंता व्यक्त करताना
सांगितले की, काही गुन्हेगारी प्रवृत्तीची मुले (Criminal Tendencies) शाळा
सुटण्याच्या वेळेस चौकात घुटमळत असतात. वेगाने वाहने चालवत (Rash
Riding) मुलींची छेडछाड करतात. त्यामुळे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस
वारजे, माळवाडी, कर्वेनगर (Karvenagar) मधील शाळांच्या
परिसरात, त्याचबरोबर बस स्टॉप परिसरात गणवेशधारी पोलिसांचे अस्तित्व (Existence
of Uniformed Police) जरी दिसले तरी मुली सुरक्षित (Girls Secured) राहत आहेत.
त्यामुळे गस्त वाढवावी अशी मागणी महिलांकडून होते आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share
Download
पोलीसांची दहशत असायलाच हवी,
उत्तर द्याहटवाऊत्तम काम