Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 17 जानेवारी 2024 (चेकमेट टाईम्स): वारजे
माळवाडी मधून गेलेल्या हायवे सर्व्हिस रस्त्याचे (Warje Highway Service
Road) काम मोठ्या कालावधी पासून रखडले आहे. त्यामुळे वारजे भागात
वाहतूक कोंडीची (Warje Traffic Jam) समस्या नित्याने उद्भवते
आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढून, रस्ता पूर्ण करावा याच्या मागणीसाठी खडकवासला
विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर (MLA Khadakwasla Bhimrao
Tapkir) यांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका आयुक्तांचा
(PMC Pune Commissioner) पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी हायवे सर्व्हिस रस्त्याबरोबरच इतरही काही रस्त्यांची कामे मार्गी लावण्याची
मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी आमदार भिमराव तापकीर यांच्यासह पुणे महानगरपालिका
आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar), माजी नगरसेवक किरण बारटक्के (Kiran Bartakke),
सुशील मेंगडे (Sushil Mengade), वृषाली चौधरी (Vrushali Choudhari), माजी स्वीकृत सदस्य दत्तात्रय चौधरी (Dattatray Choudhari), वासुदेव भोसले (Vasudev
Bhosale) यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पुणे मनपाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तर वारजे हायवे सर्व्हिस
रस्त्यासह, डुक्कर खिंड ते तिरुपती नगर डीपी रस्ता (Dukkar Khind – Tirupati Nagar DP
Road), बाएफ मधून जाणारा
डीपी रस्ता (BAIF DP Road)
यावर चर्चा करून, समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः यातील वारजे हायवे
सर्व्हिस रस्ता आणि डुक्कर खिंड ते तिरुपती नगर डीपी रस्ता लवकरात लवकर होणे
गरजेचे आहे. दरम्यान 18 मे 2023 रोजी आमदार भिमराव तापकीर यांच्या
नेतृत्वाखाली या सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतुकीस खुले करण्याची मागणी
करत घंटानाद आंदोलन (Bell Ringing Protest) करण्यात आले
होते. त्याला आता जवळपास 8 महिने पूर्ण होत आले असताना देखील या सर्व्हिस रस्त्याच्या
कामात तसूभरही प्रगती झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या झालेल्या या
पाहणी दौऱ्याचे काही फलित निघते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोथरूड, बावधन
परिसराती पाणी प्रश्नासाठी चांदणी चौक पाण्याच्या टाकीला आयुक्तांची भेट
दरम्यान कोथरूड मधील चांदणी चौक पाण्याची टाकीवरून
(Water Treatment Plant Chandani
Chowk Kothrud) भुसारी कॉलनी (Bhusari Colony),
शास्त्रीनगर (Shastri Nagar), एकलव्य कॉलेज (Eklavya Collegue) परिसर व बावधान (Bavdhan) परिसरात गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे
निर्माण झालेली पाणी टंचाई (Water Shortage) सोडवण्यासाठी महापालिका
आयुक्तांचा चांदणी चौक पाण्याच्या टाकी येथेही दौरा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आमदार भीमराव तापकीर यांच्यासह भाजपा खडकवासला मतदार संघ पश्चिमचे अध्यक्ष ॲड
गणेश वरपे (Adv. Ganesh Varpe), माजी नगरसेविका अल्पना वरपे
(Alpana Varpe), किरण दगडे पाटील (Kiran Dagade Patil), दिलीप वेडे पाटील (Dilip Vede Patil), डॉ. श्रद्धा प्रभुणे
(Dr. Shraddha Prabhune) यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते, पुणे
मनपा पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी वारजे पंपिंग स्टेशन (Warje Water Pumping Station) वरून
कमी पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, वारजे येथून येणारे पंपिंग वाढवून
चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीत तात्काळ 20 दशलक्ष लीटर पाणी वाढवून देण्याच्या
सूचना आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishore
Jagtap, Chief Engineer, Water Supply Department, PMC Pune) यांना यावेळी
दिल्या. तसेच स्वामी विवेकानंद नगर (Swami Vivekanand Nagar)
(डुक्कर खिंड) परिसरात नवीन लाईन टाकण्याचे काम लवकर सुरू करावे व सध्या या ठिकाणी
बुस्टर लावून पाणी प्रश्न निकालात काढावा असे देखील ठरले. भविष्यकाळातील गरज लक्षात
घेता या भागात लवकरच पाण्याची नवीन टाकी बांधण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी
दिले.
भाजपा खडकवासला
विधानसभा पश्चिम विभाग अध्यक्षांची अनुपस्थिती
आमदार तापकीर
यांच्याबरोबर खडकवासला विधानसभा मतदार संघातील समस्यांचा आयुक्तांचा दौरा सुरु
झाला असताना, सुरुवातील चांदणी चौक येथील पाणी प्रश्नाची पाहणी करताना या मतदार
संघाचे भाजपाचे पश्चिम विभाग अध्यक्ष उपस्थित होते. मात्र त्यानंतर वारजे मधील
समस्यांची पाहणी करताना ते अनुपस्थित होते. त्यामुळे पुणे महापालिका अधिकारी
कर्मचाऱ्यांसह आमदार आणि फक्त भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असलेल्या या
वारजे मधील दौऱ्यात मतदार संघाच्या पश्चिम विभाग अध्यक्षांना या पाहणी दौऱ्याचे
निमंत्रण नव्हते का? त्यांना जबाबदारी देण्यात आलेल्या विधानसभा मतदार संघातील
प्रश्नांपेक्षा त्यांच्या त्यांच्या प्रभागातीलच समस्या महत्वाच्या वाटतात का? असे
एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, भाजपाच्या काही पदाधिकारी
कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजीचा सूर आळवला आहे.
दौरा शासकीय
होता; खडकवासला पश्चिम विभाग अध्यक्षांचा खुलासा
सदरील दौरा हा
पुणे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी दौरा होता. त्यामध्ये चांदणी चौक पाण्याच्या
टाकीच्या आणि पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाबाबत आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून
उपस्थित होतो. वारजे भेटीबाबत निमंत्रण नव्हते. त्या त्या भागातील भाजपाचे
कार्यकर्ते उपस्थित होते. निमंत्रण असते तर आपण उपस्थित राहिलो असतो अशा प्रकारचा
खुलासा भाजपा खडकवासला विधानसभा मतदार संघाचे पश्चिम विभाग अध्यक्ष अॅड. गणेश वरपे
यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना केला.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share