Type Here to Get Search Results !

खडकवासला धरणासामोरील ऑक्सिजन पार्कसाठी कार्बनची निर्मिती; कारवाईची मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Generation of Carbon for Oxygen Park opposite Khadakwasla Dam; Demand for action


 

Generation of Carbon for Oxygen Park opposite Khadakwasla Dam; Demand for action

 

पुणे, दि. 11 फेब्रुवारी 2024 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील खडकवासला धरणासमोर असलेल्या पाटबंधारे विभागाच्या जवळपास 11 एकर जागेमध्ये ऑक्सिजन थीम पार्क उभारण्यात येणार असून, पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून पाच टप्प्यांमध्ये होणार असलेल्या या कामासाठी 3 कोटी 80 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचे भूमिपूजन रविवारी होणार आहे. मात्र ते भूमिपूजन करण्यासाठी अनेक झाडांची कत्तल करून तेथे मैदान तयार करण्यात आले असून, ती तोडलेली झाडे जाळून ऑक्सिजन नव्हे तर कार्बनची निमिर्ती केली गेल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.


 

खडकवासला धरणासामोरील ऑक्सिजन पार्कसाठी कार्बनची निर्मिती; कारवाईची मागणी


 

रविवारी या ऑक्सिजन पार्कच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी येथील अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. येथील झाडे तोडली जात असल्याने काही वृक्षप्रेमींनी झाडे तोडणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी झाडे तोडणाऱ्यांनी येथे ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार असल्याचे सांगत, त्याचे भूमिपूजन करण्यासाठी मंत्री येणार आहेत. त्यामुळे लहान झुडपे तोडून जागा सफाई सुरु असल्याचे सांगितले. मात्र येथे लहान झुडपे नव्हे तर सहा इंचापेक्षा अधिक रुंदीची खोड असलेली आणि पंधरा ते वीस फुटापेक्षा अधिक उंचीची झाडे तोडली गेली असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. तर हि झाडे तोडून त्याची लाकडे एका खड्ड्यात जमा करून ती पेटवून देण्यात आल्याचा आरोपही केला गेला आहे. त्यामुळे येथे “ऑक्सिजन पार्क करताय का ऑक्सिजन निर्मिती करणारी देशी झाडे तोडून कार्बन पार्क करताय?” असा सवाल वृक्षप्रेमींनी उपस्थित केलाय.

 


खडकवासला धरणासामोरील ऑक्सिजन पार्कसाठी कार्बनची निर्मिती; कारवाईची मागणी


 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.