Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2024 (चेकमेट टाईम्स): वारजे
ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि वारजे माळवाडी मधील एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व
असलेल्या जावेद उर्फ बाबा खान यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. यानंतर
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन,
बाबांना श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी
त्यांच्यासोबत माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी नगरसेवक सचिन दोडके, लक्ष्मी
दुधाने, संजय वाल्हेकर, रघुनाथ ठाकर, हमीद शेख यांच्यासह वारजे परिसरातील मान्यवर
उपस्थित होते.
जावेद उर्फ बाबा खान हे वारजे मधील एक असे
व्यक्तिमत्व होते, ज्यांचे “जावेद” हे नाव, त्यांच्या मृत्यू पश्चात अनेक लोकांना
समजले. हिंदू असो वा मुस्लीम त्यांनी कधीही कोणात भेदभाव केला नसल्याने ते
सर्वांचे “बाबा” होते. गावात चालणारा अखंड हरीनाम सप्ताह असो की गणपतीची मिरवणूक,
की कोणत्याही जाती धर्माचा विवाह सोहळा, सर्व कार्यक्रमांना बाबा नेहमी आपल्या
दररोजच्या कडक “गांधी टोपी” मध्ये हजर असायचे. प्रत्येकाशी आदरपूर्वक आणि
स्मितहास्य करत बोलणारे रुबाबदार व्यक्तिमत्व असलेले बाबा प्रत्येकाला आपल्या
घरातले वाटत होते. “वारजेचा विकास कशा पद्धतीने झालाय, कसा होतोय आणि कसा व्हावा,
यावर बाबांचा मोठा अभ्यास होता.” त्यासाठी त्यांनी वेळोवेळी “वारजे विकास कृती समिती”च्या
माध्यमातून अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. “गांधीवादी” असल्याने विकास
कामांमध्ये होत असलेल्या काही चुकीच्या गोष्टी पटल्या नाही, तरी ते त्याला विरोध
करत नव्हते. मात्र ते पत्रकार म्हणून आमच्याकडे याबाबत तक्रारीचा सूर आळवत. तुम्ही
यावर प्रकाश टाका, लोकांच्या हिताचे काम व्हायला पाहिजे, नेत्यांना सामन्यांच्या
व्यथा लक्षात आणून द्या असा त्यांचा नेहमी अट्टाहास असायचा. अशा बाबांच्या निधनाने
वारजे मध्ये न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share