Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
Will try to build Vishwakarma temple in Shivane Uttamnagar; Sachin Dangat's assurance
पुणे, दि. 21 फेब्रुवारी 2024 (चेकमेट
टाईम्स): शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, न्यू कोपरे या गावांच्या पंचक्रोशीत सृष्टी
रचेत्या प्रभू विश्वकर्माचे मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचे सुतोवाच
माजी स्वीकृत नगरसेवक सचिन विष्णूपंत दांगट यांनी केले आहे. आज गुरुवार दि.22
फेब्रुवारी 2023 प्रभू विश्वकर्मा जयंतीचे (Vishwakarma Jayanti)
आयोजन सचिन दांगट यांच्या कार्यालयात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विश्वकर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची (PM Vishwakarma Yojana) माहिती देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विश्वकर्मीय
बांधवांच्या हितासाठी आणलेल्या योजनांची माहिती दांगट यांनी दिली. तर समाजबांधवांच्या
प्रत्येक अडीअडचणीत आपण समाजाबरोबर आहोत असेही आश्वासन दांगट यांनी दिले आहे.
यावेळी त्यांच्यासोबत भाजपा खडकवासला सरचिटणीस उमेश सरपाटील, जाणीव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन कांबळे,
सुतार समाज भूषण गजानन वानखेडे, माऊली रायरीकर यांच्यासह सुतार समाजाचे बंधू भगिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share