Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
Warje Malwadi bus stop finally shifted; The bus will stop at this place
पुणे, दि. 20 फेब्रुवारी 2024 (चेकमेट टाईम्स): पीएमपीएमएल’च्या
वारजे माळवाडी बसथांब्याचे (PMPML Bus Stop Warje Malwadi Shifted) अखेर आज मंगळवार दि.20 फेब्रुवारी 2024 पासून स्थलांतर करण्यात आले आहे.
आज पासून कर्वेनगर, कोथरूड, डेक्कन, मनपा भवन, पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, हडपसर,
चिंचवड आणि सर्वच मार्गावर जाणाऱ्या बसेस वारजे माळवाडीच्या जुन्या बसथांब्यावर
थांबणार नाहीत. वारजे माळवाडी मध्ये होत असलेल्या नित्याच्या वाहतूक कोंडीवर
(Warje Traffic Jam) उपाय म्हणून वारजे वाहतूक विभागाच्या (Warje
Traffic Devision) वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर त्याची
अंमलबजावणी आजपासून तातडीने सुरु करण्यात आली आहे. (Pune Traffic Police)
वारजे माळवाडी
मध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी कायालयीन वेळांमध्ये वाहतूक कोंडी होत असते. या
पार्श्वभूमीवर चेकमेट टाईम्स’ने वारंवार वृत्त प्रसारित करून, वाहनचालकांसह
पादचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. दरम्यान काही दिवसांपूर्वीच वारजे वाहतूक
विभागाचा कार्यभार घेतलेले सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने (API Deepak
Kadbane) यांनी ही सर्व वृत्त पाहून, या दररोज होत असलेल्या वाहतूक
कोंडीचा अभ्यास करत, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वारजे माळवाडी
बसथांब्याच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावला आहे. यामुळे आता वारजे माळवाडी
बसथांब्याच्या चौकात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
त्याचबरोबर या पूर्ण रस्त्यावर होत असलेल्या सर्वच वाहतूक कोंडीवर उपाययोजना
करण्याचे धडाकेबाज निर्णय कादबाने घेऊ लागले असून, त्यामुळे नागरिकांची वाहतूक
कोंडीतून काही प्रमाणात सुटका (Relief from traffic Congestion) होण्यास मदत होणार आहे.
या
बसथांब्याखेरीज, अतिक्रमणे (Encroachments) आणि मनमानी पद्धतीने होत असलेले सर्व
प्रकारचे वाहनांचे पार्किंग (Nonsense Parking), रस्ते आणि
पदापथांना पडलेले खड्डे, पादचारी मार्गांचे नियोजन (Padestrian Path), सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना (Public
Transport Vehicles) शिस्त लावणे असे अनेक आराखडे सहायक पोलीस
निरीक्षक दीपक कादबाने (API Dipak Kadbane) यांनी आखले आहे.
मात्र आहे त्या रस्त्यात वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांना महानगरपालिका
(PMC Pune) आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभल्यास काही अंशी
वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते आहे.
सद्यस्थितीला हा वारजे माळवाडीचा बसथांबा जुन्या शिवाजीराव भोसले बँकेसमोर
(Shivajirao Bhosale Bank), युनियन बँकेशेजारी (Union Bank
Warje Malwadi Branch) स्थलांतरित करण्यात आला असून, प्रवाशांनी
याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचवेळी बसचालकांनी
देखील वाहतुकीला अडथळा ठरतील अशा प्रकाराने बस उभ्या केल्यास अथवा संचलन केल्यास,
त्यांच्यावर देखील कोणताही मुलाहिजा न ठेवता वाहतूक नियमांनुसार कारवाई आणि दंड
केला जाणार असल्याचा इशारा कादबाने यांनी दिला आहे. बस चालकांनी बसेस थांब्यावर
थांबवताना रस्त्याला अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांना
देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी बस येण्याची वाट पाहताना रस्त्यावर
वाहतुकीला अडथळा होईल असे थांबू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. बस थांब्यावर
आल्यावर थांबेल की नाही याच्या चिंतेत नागरिक रस्त्यावर थांबत असल्याचे निदर्शनास
आले असल्याने, प्रत्येक बस थाब्यावर येऊन थांबेल, फक्त प्रवाशांनी रस्त्यावर उभे
राहू नये असे पीएमपी प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. त्याचबरोबर वारजे माळवाडी
पासून शिवणे उत्तमनगर पर्यंत (Shivane Uttamnagar Traffic) वाहतूक
सुधारणा करण्याबाबत नागरिकांच्या काही सूचना आणि सल्ले असल्यास, ते लेखी स्वरुपात
वारजे वाहतूक विभागाला कळवल्यास, त्यावर सखोल अभ्यास करून, त्याप्रमाणे बदल करण्यासाठी
वारजे वाहतूक विभाग कटिबद्ध असेल असेही सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने यांनी
चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.
या भागातील
वाहतूक कोंडी सुटल्यास होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण (Air and Noise
Pollution) असेल की नागरिकांच्या वाहनांमधील इंधनाचा होणारा अपव्यय
टाळण्यासाठी वारजे वाहतूक विभाग कटिबद्ध असेल, मात्र नागरिकांनी वाहतुकीच्या
नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे. वाहतूक कोंडी झाल्यास अथवा एकामागे
एक वाहने थांबल्यास आपले वाहन नियमबाह्य पद्धतीने पुढे रेटण्याचा, लेन कटिंग
करण्याचा काही वाहनचालक प्रयत्न करतात. मात्र त्यांच्यामुळे वाहतूक कोंडीत भरच
पडते, अशा वाहनचालकांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक
कोंडी होऊ नये म्हणून वाहनचालकांनी देखील वाहतुकीच्या नियमांचे पालन करून, वारजे
वाहतूक विभागाला (Warje Traffic Police) सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share