Type Here to Get Search Results !

बाणेर मधील या 3 रुफ टॉप हॉटेलवर पुणे महापालिकेची कारवाई, 9 वर गुन्हे दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today

 

Action of Pune Municipal Corporation on these 3 Roof Top Hotels in Baner, Cases Filed Against 9

 

Action of Pune Municipal Corporation on these 3 Roof Top Hotels in Baner, Cases Filed Against 9

 

पुणे, दि. 25 मे 2024 (Checkmate Times): कल्याणीनगर (Kalyani Nagar) मधील घटना घडल्यानंतर आता कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेला पुणे महानगरपालिकेचा बांधकाम विभाग (Construction Department PMC Pune) खडबडून जागा झाला आहे. पालिकेच्या बांधकाम परवाना विभागाने आज शुक्रवार दि.25 मे 2024 बाणेर मधील 3 रूफ टॉप हॉटेल’वर (Roof Top Hotels in Baner) कारवाई करून पत्राशेड व अनधिकृत बांधकामे निष्कासित केली. त्याचबरोबर 9 रूफ टॉप हॉटेल’वर गुन्हे दखल करण्यात आले असून, आणखीन 2 हॉटेल बाबत नव्याने तक्रारी देण्यात आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी सध्याच्या राज्यसभेच्या खासदार आणि हा बाणेर भाग ज्या कोथरूड विधानसभा मतदार संघात येतो त्या विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी शहरातील सर्वच भागातील रूफ टॉप हॉटेल बाबत पुणे शहर पोलिस आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांना भेटून याबाबत निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. यानंतर झालेल्या या कारवाईने रूफ टॉप हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

 


 

पुणे महानगरपालिका बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर (PMC Superintending Engineer Sridhar Yevlekar), बांधकाम विभाग झोन क्र.3 चे कार्यकारी अभियंता जयवंत पवार (Executive Engineer Jaywant Pawar) यांचे मार्गदर्शनाखाली, उप अभियंता प्रकाश पवार (Prakash Pawar), कनिष्ठ अभियंता अजित सणस (Ajit Sanas), संदीप चाबुकस्वार (Sandeep Chabukswar), केतन जाधव (Ketan Jadhav) यांच्यासह, अतिक्रमण विभागाच्या 6 पोलिस, 1 जेसीबी, 2 गॅस कटर, 1 ब्रेकर, 10 अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या कारवाई मध्ये हॉटेल इमेज रेस्टो बार (Image Family Restaurant and Bar, Baner), बाणेर हायवे लगत असलेले आइस अँड फायर हॉटेल (Ice N Fire Sky Lounge Rooftop Restaurant and Club, Baner) आणि रांका ज्वेलर्सच्यावर असलेले हॉटेल हाईव्ह (The Hive A Luxury Club, Baner) या 3 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये सुमारे 11 हजार 925 चौरस फूट अनधिकृत बांधकाम क्षेत्र निष्कासित करण्यात आले. तसेच बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याव्यतिरिक्त 2 हॉटेल वर गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार देण्यात आली असल्याचे पुणे महानगरपालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 


 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.