Type Here to Get Search Results !

पहिल्यांदाच घेतलेल्या वारजे आयडॉल 2K24 कराओके गायन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today

 

 

Huge response to the first ever Warje Idol 2K24 karaoke singing competition

Huge response to the first ever Warje Idol 2K24 karaoke singing competition

 

पुणे, दि. 22 मे 2024 (चेकमेट टाईम्स): वारजे मध्ये किंबहुना खडकवासला विधानसभा (Khadakwasla Vidhansabha) मतदार संघात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या “वारजे आयडॅाल 2024” (Warje Idol 2024) कराओके गायन स्पर्धेला (Karaoke Singing Competition) प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. स्थानिकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्वीकृत नगरसेवक सचिन दशरथ दांगट (Sachin Dangat) यांच्या माध्यमातून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांच्या हस्ते पार पडला.

 


anjali pangare first winner at warje idol 2024
 

पहिल्यांदाच आयोजित या “वारजे आयडॉल 2024” स्पर्धेसाठी जवळपास 250 स्पर्धकांनी नाव नोंदणी करत, सहभाग नोंदवला. यापैकी 30 स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत, त्यातील 7 विजेते ठरवण्यात आले. तर 4 गायकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. हि स्पर्धा एवढी चुरशीची (Fierce Competition) आणि दर्जेदार ठरली कि, फक्त 3 बक्षिसे आणि उत्तेजनार्थ बक्षिसे देण्याचे नियोजन असताना, कोणाला विभागून बक्षिसे देण्यापेक्षा विजेत्यांच्या कष्टाचे चीज करावे या हेतूने क्रमवार बक्षिसे देण्याचे आयत्यावेळी नियोजन करून, संयोजन समितीने स्पर्धकांच्या पाठीवर कौतुकाची थाप (Clap of Appreciation) दिली. यावेळी देण्यात आलेले चषक पाहून तर विजेते हरखून गेले.

 


sugandh pandit winner at warje idol 2024
 

यंदा प्रथमच आयोजन केलेल्या “वारजे आयडॅाल 2024” या कराओके गायन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाच्या मानकरी अंजली पांगारे (Anjali Pangare) ठरल्या तर द्वितीय क्रमांक प्रिती वाटे (Priti Vate), तृतीय क्रमांक करण गायकवाड (Karan Gaikwad), चतुर्थ क्रमांक साई तामकर (Sai Tamkar), पाचवा क्रमांक सुगंध पंडित (Sugandh Pandit), सहावा क्रमांक मोनिका ओड (Monika Oad), सातवा क्रमांक भीमा पंडित (Bhima Pandit) या स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट गायनाने “वारजे आयडॅाल 2024” हा पुरस्कार पटकावले. विजेत्यांना आमदार भिमराव तापकीर, खडकवासला विधानसभा अध्यक्ष गणेश वरपे (Ganesh Varpe), सचिन मोरे (Sachin More), माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर भोरकडे (Prabhakar Bhorkade), नाट्य परिषदेचे खजिनदार अशोक जाधव (Ashok Jadhav), स्वीकृत नगरसेवक संजय भोर (Sanjay Bhor), आकांक्षा नारी मंचच्या अध्यक्षा मनीषा दांगट (Manisha Dangat), भावना पाटील (Bhavana Patil), देवेंद्र सूर्यवंशी (Devendra Suryawanshi) आणि परिक्षक म्हणून काम पाहिलेल्या अशोक जाधव (Ashok Jadhav), संजय मरळ (Sanjay Maral), जितेद्र भुरूक (Jitendra Bhuruk), अनिल घाटगे (Anil Ghatage) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit), अशोक उनकुले (Ashok Unkule) यांनी केले.

 


 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.