Type Here to Get Search Results !

2024 लोकसभा निवडणूक, बारामती लोकसभा मतदार संघात तुमची पसंती कोणत्या पक्षाला ?

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today, loksabha election polling, loksabha election voting, this is not opinion poll, General Election 2024, Election Commission of India,

2024 Lok Sabha Election, Baramati Lok Sabha Constituency Which Party Do You Prefer?

Which Party Do You Prefer? in Baramati Lok Sabha Constituency for Lok Sabha Elections 2024 

 

पुणे, दि. 21 मे 2024 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections of Maharashtra) पहिल्या चार टप्प्यांपेक्षा सोमवार दि.20 मे 2024 मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नाशिकमध्ये (Nashik) मतदानाचा उत्साह अधिक होता. धृवीकरणाच्या (Polarization) शक्यतेने दोन्ही बाजूंचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जोर लावल्याने मतदार (Voters) सकाळपासूनच हिरिरीने बाहेर पडले. अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. यावेळी मतदानाच्या (Voting) सर्वच टप्प्यात ऊन जरा जास्तच कडक असल्याने मतदारांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. मुंबई तसेच ठाणे, कल्याण (Kalyan), भिवंडी (Bhiwandi), पालघर (Palghar), नाशिक, दिंडोरी (Dindori) आणि धुळे (Dhule) या 13 मतदारसंघांत अपवाद वगळता महाराष्ट्रभर मतदान शांततेत पार पडले. एरवी मतदान करून लगेच बाहेर पडता येते. मात्र यावेळी बरीच रखडपट्टी झाल्याची तक्रार मतदार करीत होते. मतदान केंद्रांची संख्या कमी केल्याचा अनुभव आल्याचे काही जणांनी सांगितले.

 

 

2019 च्या निवडणुकीपर्यंत एका मतदान केंद्रात (Polling Station) चार किंवा अधिक कक्ष असत. मात्र यावेळी दोनच खोल्यांचा वापर झाला. त्यामुळे कक्षनिहाय मतदारांची संख्या वाढल्याने रांगा लागल्या. मतदान प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्याऐवजी नाहक गोंधळ घातल्याचा आरोप मतदारांनी केला. मतदार याद्यांची पुनर्रचना (Reorganization of Electoral Rolls) करतानाही घोळ झाला. अनेकांची मतदान केंद्रे बदलली तर काहींची घरापासून दूर होती. यामुळे मतदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. एकाच घरातील दोघांची नावे दोन वेगवेगळ्या केंद्रांवर आली. मतदार यादीतून नाव अचानक गायब झाले (Name Disappeared from Voter List), अशा कारणांमुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला. मतदान यंत्र आणि व्हिव्हीपॅटमध्ये (EVM / VVPAT) बिघाड, विजेचा खेळखंडोबा आणि कर्मचाऱ्यांचा संथ कारभार, यामुळे वाढत्या उन्हातही उत्साहाने मतदानाला आलेल्यांचे प्रचंड हाल झाले. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र परिसरात मोठा मंडप उभारणार, रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी टोकन देऊन विश्रांती कक्षात बसण्याची व्यवस्था करणार, पाणी, ओआरएसची (ORS) व्यवस्था करणार अशा अनेक घोषणा आयोगाकडून (Election Commission of India) करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात बहुतांश केंद्रांवर यातील एकही सोय दिसली नाही.

 

 

अनेक ठिकाणी मैदानात पत्र्याच्या शेडमध्ये मतदान केंद्रे उभारली होती. तेथे पंखे, पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांचीही गैरसोय (Inconvenient) झाली. या ढिसाळपणामुळे काही ठिकाणी तर मतदान न करताच मतदार परत जात असल्याचे यंदाच्या निवडणुकांमध्ये प्रकर्षाने दिसले. आता निवडणूक आयोगाच्या अधिकृत निवडणुका पार पडल्या आहेत. तुम्ही मतदान केले असेल तर कोणाला केले? नसेल केले तर कोणाला केले असते? तुम्ही या मतदार संघातील मतदार नाहीत, मात्र तुमची तुमच्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून कोणालातरी पसंती दर्शवायची आहे? तुमचे वय अजून 18 वर्ष पूर्ण नसल्याने तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही, मात्र तरीही आपल्याला कोण चांगले कार्य करतो याची जाण आहे, अशावेळी आपली पसंती कोणालातरी दर्शवायची आहे? मतदान हा आपला अधिकार आहे आणि आपण तो बजावलाच पाहिजे अशा मनात भावना असूनही, आपल्या मतदान क्षेत्रापासून शेकडो / हजारो किलोमीटर दूर असल्याने या प्रक्रियेत सहभागी होता येत नाही, सुट्टी नाही, पोस्टल मतदान करता येत नाही, अशा सर्वांसाठी हे व्यासपीठ खुले आहे.

 

 

भारतातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदले पाहिजे. मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये आपले नाव आहे का? हे तपासून पाहण्याचे आवाहन केले जाते. त्या आवाहनाचा आदर करून आपले नाव अगोदरच यादीत आहे का ते तपासले पाहिजे. अन्यथा यावर्षी आपण अशा अनेक बाबी पाहिल्या की, मतदान केंद्रावर गेल्यावर आपल्याला समजते कि आपले नाव मतदार यादीत नाही. अशावेळी मनस्ताप, वेळेचा अपव्यय आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यापासून वंचित राहण्याची वेळ असा तिहेरी तोटा हा मतदाराचा (Loss of Voter) होतो. हा तोटा मतदाराचा नसतो तर तो देशाचा असतो (Loss of Nation), याचा विचार देशातील प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आवाहन करतो कि, प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भेट देऊन आपले नाव यादीत आहे का ते तपासावे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावांची ऑनलाईन नावनोंदणी (Online Registration) करण्याची तेथे सोय आहे. त्याचबरोबर घरातील मृत पावलेल्या दिवंगत व्यक्तींची नावे वगळण्यासाठी देखील तेथे स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 

त्यामुळे आपल्या अमुल्य मताचे दान करायलाच हवे !

Therefore, you should donate your valuable opinion !

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हायलाच हवे !!

Must participate in the celebration of democracy !!

इतरांना देखील मतदानाला प्रेरित करायलाच हवे !!!

Others must also be inspired to vote !!!

 

निवडणूक आयोगाची मतदात सेवा पोर्टल लिंक: (आपण खालील लिंकवर क्लिक करून आपल्याला हवी असलेली मदत स्वत: मिळवू शकता)

Election Commission Polling Service Portal Link: (You can get the help you need by clicking below link)

https://voters.eci.gov.in/

 

 

* E निवडणूक हा एक्झिट पोल नाही. त्याचा उद्देश फक्त तुम्हाला मतदानासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.

* E election is not an exit poll. Its purpose is only to encourage you to vote.

 

* तुम्ही येथे प्रविष्ठ केलेली माहिती (मत वगळता) आमच्या पातळीवर पूर्णपणे गोपनीय राहील आणि कोणत्याही तृतीय पक्षाशी शेअर केली जाणार नाही.

* Your data will remain confidential and will not be shared with any third party.

 

* या E मतदानाचे निकाल 1 जून 2024 रोजी 7 व्या टप्प्यातील अंतिम मतदान झाल्यानंतरच सार्वजनिक केले जातील.

* The results of this E poll will be made public only after the final poll on 1 June 2024.

 

* तुमच्यासारखे मतदान कोणी केले? हे फक्त आकड्यांमध्ये पाहण्यासाठी 2 जून 2024 रोजी आमच्या सोशल मिडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर या E निवडणुकीत नेमके किती लोकांनी कोणाला मतदान केले हे तपासू शकता. ते आम्ही सार्वजनिक करू. मात्र येथे कोणी कोणाला मत दिले हे कोणालाच समजणार नाही, अगदी आम्हाला देखील.

* Who voted like you? Just to see it in numbers you can check exactly how many people voted for whom in this E-election on 2nd June 2024 on all our social media platforms. We will make it public. But no one will know who voted for whom here, not even us.

 

* अस्वीकरण: हे सर्वेक्षण केवळ संशोधनाच्या उद्देशाने आहे आणि एक्झिट पोल, ओपिनियन पोल किंवा लोकप्रतिनिधी कायदा 1951 आणि/किंवा भारतीय निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेल्या कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित असलेले कोणतेही सर्वेक्षण तयार करत नाही. या सर्वेक्षणातील राजकीय पक्षाच्या प्राधान्यांबाबत तुमचा सहभाग आणि प्रतिसाद ऐच्छिक आहेत आणि कोणत्याही तृतीय पक्षासह सामायिक केले जाणार नाहीत. गोळा केलेली माहिती केवळ विश्लेषणात्मक हेतूंसाठी वापरली जाईल आणि कोणत्याही निवडणुकीच्या निकालाचा अंदाज लावण्यासाठी किंवा त्यावर प्रभाव टाकण्यासाठी वापरली जाणार नाही. भारतातील सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या समाप्तीनंतरच या सर्वेक्षणाचा निकाल प्रकाशित केला जाईल.

* Disclaimer: This survey is intended solely for research purposes and does not constitute an exit poll, opinion poll or any survey that is prohibited under the Representation of Peoples Act 1951 and/or any guidelines published by Election Commission of India. Your participation and responses regarding political party preferences in this survey are voluntary and will not be shared with any third party. The information collected will be used for analytical purposes only and will not be used to predict or influence the outcome of any election. The result of this survey will only be published after conclusion of General Election 2024 in India.

 

टीप: तुमचे मत पूर्णपणे गोपनीय राहील आणि तुम्ही कोणाला मत दिले याची माहिती येथे कोणाशीही शेअर केली जाणार नाही.

Note: Your vote will be completely confidential and the information about whom you voted for will not be shared with anyone.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

 

तुमचे मत येथे व्यक्त करा : तुमचे मत पूर्णपणे गोपनीय राहील आणि तुम्ही कोणाला मत दिले याची माहिती येथे कोणाशीही शेअर केली जाणार नाही.

Express your opinion here: Your vote will be completely confidential and the information about whom you voted for will not be shared with anyone.

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.