Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today
As soon as the elections are over, the toll price increase is announced, milk becomes expensive; Petrol and gas prices are also likely to increase soon
पुणे, दि. 3 जून 2024 (Checkmate Times): “गरज सरो आणि
वैद्य मरो” हि म्हण तुम्ही ऐकलीच असेल, किंबहुना अनुभवली असेल आणि नसेल तर आता
अनुभव मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी (Before
Loksabha Election) दर महिन्याच्या पहिल्या तारखेला वाढणाऱ्या गॅसच्या (LPG Price
Hike) किमती 100 रुपयांनी कमी करत, पेट्रोलचा (Petrol Price Hike) दर देखील
बरेच दिवस स्थिर ठेवत, मते पदरात पाडून घेतल्यानंतर आता मतदारांची गरज नसल्याच्या (No Need
of Voters) अविर्भावात शासन आले आहे काय? असा प्रश्न सामान्य मतदार विचारू लागला आहे.
झालंय असं कि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI) देशभरातील
टोलमध्ये सरासरी 5 टक्क्यांनी (Toll Price Hike) वाढ करण्याचा निर्णय
घेतला. त्यानंतर आता अमूल दुध देखील 2 रुपयांनी महागलं (Amul Milk Price Hike) आहे. तर
पुढील काही दिवसांत अनेक दिवसांपासून न झालेली पेट्रोल, डीझेल (Disel Price
Hike), सीएनजी (CNG Price Hike) आणि घरगुती वापराच्या गॅसच्या
किमतीही वाढण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते आहे. “त्यामुळे हीच का ‘मोदी की
गॅरंटी’ (Modi Ki Guarantee) निवडणुकांचा निकाल यायच्या आधी”, (Before
Loksabha Election Results) असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ
लागला आहे.
लोकसभा
निवडणुकांचा शेवटचा टप्पा पार पडल्याबरोबर घोषित करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना
मोठा झटका बसलाय. अमूल ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांची (Amul Milk
Products) विक्री करणाऱ्या गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (Gujarat
Co Operative Milk Marketing Federation) दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली
आहे. अमूल गोल्ड (Amul Gold), अमूल ताजा (Amul Taza) आणि अमूल
शक्तीच्या (Amul Shakti) दरामध्ये ही वाढ झाली आहे. अमूलने दूधाच्या दरातील वाढ
ही केवळ एका राज्यासाठी नाहीतर संपूर्ण देशभरात केली आहे. त्याचबरोबर भारतीय
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील टोलनाक्यांच्या
टोलमध्ये सरासरी 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महामार्गावरून
वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला अधिक झळ सोसावी लागणार आहे. पर्यायी त्याची
झळ सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे. साधारणपणे दरवर्षी 1 एप्रिलपासून टोलचे
दर वाढत असतात. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीमुळे हि दरवाढ काही काळासाठी
प्रलंबित ठेवली असल्याचे बोलले जाते आहे.
महाराष्ट्रातील
काही शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किंचीत बदल झालेला दिसून आला आहे. यामध्ये
महाराष्ट्रातील धुळे (Dhule) शहरांत गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला
म्हणजेच 31 मे 2024 ला पेट्रोलची किंमत 103 रुपये 96 पैसे प्रति लिटर होती, जी आता
104 रुपये 10 पैसे झाली आहे. तर जळगावमध्ये (Jalgaon) 104 रुपये 35
पैसे प्रति लिटर असलेली पेट्रोलची किंमत आता 105 रुपये 24 पैसे प्रति लिटर झाली
आहे. तसेच डिझेलच्या किमती मध्ये देखील काही अंशी दरवाढ झालेली दिसून येत असल्याचे
समजते. नागपूर (Nagpur) आणि पालघरमध्ये (Palghar) मात्र पेट्रोलच्या
किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. तर लातूर (Latur) मध्ये
डीझेलच्या किमतीत घसरण झाली असल्याचे दिसते आहे. पण टप्प्याटप्प्याने सर्वत्र
पेट्रोल, डीझेल, सीएनजी आणि घरगुती वापराच्या गॅसच्या किमतीही वाढण्याची शक्यता
सूत्रांकडून वर्तवली जाते आहे. त्यातच आता सुरु होत असलेल्या शैक्षणिक सत्राच्या (Academic
Session 2024 - 25) पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्याची देखील 5 ते 15
टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली आहे. त्याचवेळी शेती (Agriculture) मध्ये
आवश्यक असलेल्या रासायनिक खतांच्या किमती (Fertilizers Prices
Hike) देखील ऐन पेरणीच्या पार्श्वभूमीवर वाढल्या आहेत. त्यामुळे या वाढीव दराचा
परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर
वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share