Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
A Big Tree Fell on the Top of the Car, the Driver Wearing Headphones did
not even notice
पुणे, दि. 24 जून 2024 (Checkmate Times): वारजे माळवाडी
(Warje Malwadi) मधील अतुलनगर (Atul Nagar)
जवळ सर्व्हिस रस्त्यावर (Service Road) भलेमोठे निलगिरीचे
झाड (Eucalyptus Tree) कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.
त्याहून धक्कादायक म्हणजे ते झाडाच्या फांद्या एका गाडीच्या टपावर देखील आपटल्या.
मात्र कानात हेडफोन घालून बसलेल्या वाहनचालकाला कोसळत असलेल्या झाडाचा आवाज देखील
आला नाही. त्यामुळे त्याचे केवळ नशीब बलवत्तर म्हणावे लागेल, अशाच काही भावना
प्रत्यक्षदर्शिनी वर्तवल्या.
याबाबत प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या
माहितीनुसार, वारजे माळवाडी, हायवे सर्व्हिस रस्त्यावर, अतुलनगर जवळ असलेल्या एका
खाजगी बँकेसमोर आज सोमवार दि.24 जून 2024 सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन
सर्व्हिस रोडच्या मध्ये असलेले ५० फुट उंचीचे भले मोठे निलगिरीचे झाड धाडकन
कोसळले. सुदैवाने यावेळी पदपथावरून (Footpath / Padestrian Path) सायंकाळच्या वेळी
चालणारे पादचारी अथवा रस्त्याने जाणारे कोणी वाहनचालक याखाली सापडले नाही,
त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका महिंद्रा
पिक-अप टेम्पोच्या टपावर झाडाची एक फांदी आपटली. यातही टेंपोचालकाचे सुदैव म्हणजे,
त्याच्या टपावर लोखंडी रेलिंग लावले असल्याने टप चेंबले नाही. अन्यथा त्याखाली
सापडून टेंपो चालक जखमी होण्यासारखी दुर्दैवी घटना घडली असती. विशेष म्हणजे या
टेंपो चालकाने कानात हेडफोन घातलेले असल्याने त्याला झाड कोसळत असल्याचा आवाज
देखील आला नाही.
संतोष वेंकटराव बिराजदार (Santosh Venkatrao Birajdar) (वय.33
उंड्री, पुणे) असे त्या दुर्घटनेत वाचलेल्या टेंपो चालकाचे नाव असून, तो MH 14 HU 0381 हा टेंपो घेऊन, उंड्री वरून वारजे मध्ये
इलेक्ट्रिकल आर्थिंगचा माल घेऊन आला होता. दरम्यान भाजपचे माजी स्वीकृत नगरसेवक
सचिन दशरथ दांगट (Sachin Dashrath Dangat) यांनी घटना
घडल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाला (Warje Fire Brigade)
पाचारण करत, रस्त्यावर पडलेले झाड काढण्याबाबत विनंती केली. त्याचबरोबर वारजे
वाहतूक विभागाला याबाबत कळवून, वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता घेतली होती.
फांद्या छाटून झाडांचा भार तत्काळ
हलका करण्याबाबत मागणी केली आहे: सचिन दोडके
या
रस्त्यावर आपण अनेक स्वदेशी वृक्षांची (Local Trees) लागवड केली आहे. त्यात
यावर्षी तर आपण स्वखर्चातून आणि नागरिकांच्या सहभागातून लावलेल्या सीताफळ, डाळिंब,
जांभूळ आणि फणसाच्या झाडांना फळे देखील आली होती. मात्र काही जुने वृक्ष आता कमजोर
झाले आहेत. त्याच्या फांद्या छाटून, अशा झाडांचा भार हलका करण्याबाबत यापूर्वीच
उद्यान विभागाला (PMC Pune Garden Department) सुचना केलेल्या आहेत.
ज्यामुळे असे वृक्ष कोसळणार नाहीत आणि त्यापासून होणारे संभाव्य नुकसान टळेल. आपण
आतापर्यंत सर्व्हिस रोडवर लावलेल्या झाडांपैकी 80 टक्के झाडे जगली आहेत. एवढ्या
मोठ्या प्रमाणात कुठेही झाडे जगत नाहीत. मात्र आपण हि झाडे नुसती लावली नाहीत, तर
त्याचे संगोपन करण्यात सातत्य ठेवल्याने, त्याचे सकारात्मक फलित समोर येते आहे. हा
भाग सुंदर आणि हरित करण्यासाठी आपण प्रयत्नरत असून, पावसाला चांगली सुरुवात
झाल्यानंतर आणखीन वृक्ष या मार्गिकेवर लावण्याचा संकल्प माजी नगरसेवक सचिन दोडके (Sachin
Dodke) यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना व्यक्त केला.
माजी
नगरसेवक सचिन दोडके हे झाड पडल्याचे समजताच घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी
तत्काळ अग्निशमन दल, पुणे महानगरपालिकेचा उद्यान विभाग, वारजे वाहतूक पोलिसांना (Warje
Traffic Police) पाचारण करत, सर्व यंत्रणा एकाचवेळी कामाला लावत, नागरिकांची गैरसोय होऊ
नये याची दक्षता घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दाखल झालेल्या वारजे अग्निशमन
दलाच्या तांडेल प्रमोद मरळ, चालक दत्ता गोगावले, रमेश भिलारे, धर्मराज
माने, विकास ओव्हाळ, सुरेश चौधरी, साहिल पडे
यांच्या पथकाने उद्यान विभागाचे मुकादम ओंकार थरकुडे यांच्या सहकार्यातून तत्काळ
पडलेल्या झाडाच्या फांद्या हटवत रस्ता मोकळा करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
त्याचबरोबर वारजे वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस
अंमलदार राकेश कांबळे, लहू लोंढे यांच्या पथकाने संभाव्य वाहतूक
कोंडी टाळत नागरिकांची संभाव्य गैरसोयीतून सुटका केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर
वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share