Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
Gutkha supplier nabbed by police in Warje; 80 thousand seized
पुणे, दि. 22 जून 2024 (Checkmate Times): वारजे
पोलिसांना (Warje Police) गुंगारा देत अनेक दिवसांपासून राजरोसपणे
बंदी असलेल्या सुगंधित सुपारी, गुटखा सप्लाय (Banned Scented Betel Nut, Gutkha
Supplier) करणाऱ्याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.
त्याच्याकडून 79 हजार 838 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात वारजे पोलिसांना यश आले
आहे. याबाबत वारजे पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई मनोज पवार (Manoj Pawar) यांनी फिर्याद दिली असून, पोलिस हवालदार प्रदीप शेलार (Pradip
Shelar) पुढील तपास करत आहेत.
याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, वारजे माळवाडी
(Warje Malwadi) परिसरात शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित
सुपारी, गुटखा विक्री होऊ नये म्हणून वारजे पोलिस सातत्याने प्रयत्नरत होते.
त्यानुसार अशा पदार्थांच्या विक्रीला अटकाव घालण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र
कोणीतरी अज्ञात व्यापारी वारजे परिसरात फेरी करून, प्रतिबंधित सुगंधित सुपारी,
गुटखा विक्री करत असल्याचे समोर येत होते. त्याच्या पाळतीवर पोलिसांचे पथक असताना,
निरनिराळ्या खबऱ्यांचे जाळे तैनात करण्यात आले होते. त्यानुसार बुधवार दि.19 जून
2024 रोजी वारजे पोलिसांच्या गोपनीय बातमीदाराने (Confidential
Correspondent) तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रणजीत मोहिते
(API Ranjit Mohite) यांना “हवा असलेला गुटखा व्यापारी एका ठिकाणी
गुटखा सप्लाय करणार असल्याची माहिती मिळाली.”
वारजे पोलिसांना मिळालेल्या
माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे (PI Manoj Shedge), पोलिस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ
शेळके (PI Nilkanth Shelke) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक
पोलिस निरीक्षक रणजीत मोहिते, पोलिस अंमलदार प्रदीप शेलार, संभाजी दराडे (Sambhaji
Darade), विक्रम खिलारी (Vikram Khilari),
विजय भूरूक (Vijay Bhuruk), अमोल सुतकर (Amol Sutkar), विकास पोकळे (Vikas Pokale), दक्ष पाटील (Daksh
Patil) यांच्या पथकाने, मिळालेल्या माहितीनुसार वारजे हायवे
सर्व्हिस रस्त्यावर (Warje Highway Service Road) असलेल्या
साई सयाजी नगर (Sai Sayaji Nagar) कमानीजवळ बुधवार दि.19 जून
2024 रोजी रात्री 5 वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. दरम्यान काही वेळात 5 वाजून
40 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, मरून रंगाच्या होंडा अॅकटीव्हा (Honda
Activa) स्कूटर क्र. MH 12 TM 5280 वरून एक इसम पांढऱ्या
रंगाच्या दोन पोत्यांमध्ये काहीतरी घेऊन येत असल्याचे दिसले. यावेळी पोलिस पथकाने
त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ते पोलिस असल्याचा संशय आल्याने तो
पळून जाऊ लागला. यावेळी पोलिसांच्या पथकाने त्याच्या मागे धाव घेत, त्याच्या
शिताफीने मुसक्या आवळल्या.
दरम्यान
त्याला वारजे पोलिस स्टेशनला (Warje Police Station) आणून, त्याला
विश्वासात घेऊन, पोत्यात असलेल्या वस्तूबद्दल विचारणा केली असता, तो उडवाउडवीची
उत्तरे देऊ लागला. यावेळी पोलिसांच्या पथकाने त्याच्या पोत्यांमध्ये पाहिले असता,
त्यामध्ये विमल (Vimal), रजनीगंधा (Rajanigandha), आरएमडी (RMD) असा
प्रतिबंधित सुगंधित सुपारी, तंबाखूजन्य गुटखा असल्याचे दिसून आले. यावेळी त्याचे
नाव विचारले असता, त्याने आपले नाव जीवन मनोहर नेमाणे (Jivan Manohar Nemane)
(वय.39, रा. बालाजी मंदिराजवळ, सहयोग नगर, वारजे माळवाडी, पुणे) असल्याचे
सांगितले. यावरून त्याच्यावर महाराष्ट्र अन्न सुरक्षा मानके अधिनियम (Maharashtra
Food Safety Standards Act) आणि इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात
आला असून, त्याला अटक (Gutkha Supplier Arrested) करण्यात आली आहे.
यामध्ये त्याच्याकडून एकूण 39 हजार 838 रुपयांची सुगंधित सुपारी आणि तंबाखू, 40
हजार रुपये किमतीची होंडा
अॅकटीव्हा स्कूटर जप्त करण्यात आली आहे. वारजे पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार
प्रदीप शेलार पुढील तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर
वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share