Type Here to Get Search Results !

एका कुलुपाने आख्या पालिकेच्या बांधकाम विभागाला झुकवले; 4 तास दारात बसून पथक माघारी फिरले

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

Establishment was Locked, PMC Pune Construction Department Walked without Action

 

Establishment was Locked, PMC Pune Construction Department Walked without Action

 

पुणे. दि.29 जून 2024 (Checkmate Times): पुणे महानगरपालिका (PMC Pune) प्रशासनाला एका कुलुपाने झुकवल्याची हास्यास्पद आणि तितकीच आश्चर्यकारक घटना वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधून समोर आली आहे. वारजे माळवाडी मधील हायवे सर्व्हिस रस्त्यावर महिंद्रा शोरूमच्या (Warje Highway Mahindra Showroom) खाली असलेल्या अनधिकृत जिमचे (The Pack Gym Crossfit) बांधकाम तोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभागाचे पथक दाखल झाले होते. मात्र जिमला कुलूप लावून संचालक गायब झाल्याने, तब्बल 4 तास थांबून पालिकेच्या पथकाला कारवाई न करता मागे फिरण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे या घटनेत पालिकेच्या बांधकाम विभागाला फक्त झुकवलेच नव्हे तर नाचवले आणि वाकवले पण अशा चर्चा तेथे उपस्थितांपैकी नागरिक करत असल्याचे समोर आले आहे.

 

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या इमारतीच्या बेसमेंट मधील कॉमन पार्किंग (Common Parking in Basement) स्पेस मध्ये बेकायदेशीररित्या जिम थाटण्यात आलेली होती. या जिमच्या माध्यमातून एकीकडे भाडे कमावून, दुसरीकडे पालिकेचा लाखो रुपयांचा कर संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून बुडवला जात आहे. इमारतीत आलेल्यांच्या पार्किंगची गैरसोय केली जात आहे. त्यांची वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने सर्व्हिस रोडवर वाहतुकीची कोंडी होते आहे. मात्र वर्षानुवर्षे तक्रारी पेंडिंग असताना देखील पालिकेचा बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करत होता. यामागे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप तेथे उपस्थित तक्रारदाराने केला आहे.

 

तर आज स्थानिक पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने कारवाई मध्ये व्यत्यय आला. मात्र पुढील काही दिवसांत पुरेसा पोलिस बंदोबस्त घेऊन कारवाई करणार आहोत. तर हि इमारत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या दुसऱ्या इमारतीत देखील अशाच प्रकारे पार्किंग मध्ये बेकायदेशीर फर्निचरचे शोरूम थाटण्यात आले होते. फ्रंट मार्जीनच्या पार्किंग मध्ये देखील मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर टपऱ्या टाकून व्यवसाय थाटण्यात आलेले आहेत. इमारतीच्या बाहेरून बेकायदेशीर लोखंडी जिना बनवला आहे, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या सर्वच बाबींवर कडक कारवाई करणार असल्याचे उपअभियंता निवृत्ती उथळे (Nivrutti Uthale) यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.