Type Here to Get Search Results !

पुण्यात पालख्या येणार आणि शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; खडकवासला धरणावरून हे मोठे कारण आले समोर...

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

 

Pune and the city's water supply will be disrupted; This big reason came up...

Pune and the city's water supply will be disrupted; This big reason came up...

 

पुणे. दि.29 जून 2024 (Checkmate Times): जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे (Sant Tukaram Maharaj Palkhi) काल प्रस्थान झाले आणि आज संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी सकाळी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावरून (Parvati Water Treatment Plant, PMC Pune) पाणी पुरवठा होत असलेल्या पुणे शहरातील भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत (Water Supply Disrupted) झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याचे कारण देखील समोर आले असून, अशा अत्यावश्यक सेवा (Essential Services) बंद पडत असताना, तातडीच्यावेळी वापरण्यासाठी दुसरा पर्याय (Alternative System) मात्र पालिकेकडे नसल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आहे. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह, विद्युत विभागाचा हा हलगर्जीपणा नाही का असा सवाल उपस्थित होतो आहे.

 

 

आज शनिवार दि.29 जून 2024 सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणावरील पर्वती पंपिंग स्टेशनच्या (Parvati Pumping Station on Khadakwasla Dam) डीपी बॉक्स मधून धुर येऊ लागला. यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी जवळपास 5 आग रोधक सिलेंडर (Fire Extinguisher) मधून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीवर नियंत्रण मिळत नव्हते. दरम्यान यावेळी दाखल झालेल्या वारजे अग्निशमन दलाच्या (Warje Fire Station) तांडेल शिवदास खुटवड, राजेंद्र पायगुडे, अग्निशमन जवान बाबू शीतकल, श्रीराज सस्कर, संजय चौरे, किरण ठुले, सागर सोनावणे, मनोज गायकवाड, अनिकेत जाधव, चालक शेट्ये, यांच्या पथकाने डीपी पॅनल बॉक्सला लागलेल्या आगीचे गांभीर्य ओळखून, सावधपणे पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे 4 डीपी पॅनल पैकी, 1 डीपी पॅनल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत, इतर 3 वाचले. मात्र यामुळे पुणे शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने, सकाळी सकाळी पुणेकरांची पाण्याची ओरड झाली.

 

 

तीन तासाच्या आत दुरुस्तीचे काम करून, पाणीपुरवठा सुरळीत होईल

झालेली घटना लहान असून, मोठी आग लागलेली नव्हती. शहराच्या काही भागातला पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. मात्र गुरुत्व प्रणालीने (Gravity System) काही अंशी पाणीपुरवठा होत आहे. जळलेल्या डीपी बॉक्स पॅनलच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असून, ते पुढील दोन ते तीन तासात पूर्ण करून, शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग युद्धपातळीवर काम करत आहे. शहरात येणाऱ्या पालख्यांमध्ये वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

नंदकिशोर जगताप (मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महानगरपालिका)

Nandkishore Jagtap (Chief Engineer, Water Supply Department, Pune Municipal Corporation)

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.