Checkmate Times,
Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news,
political news, business news, Marathi news today
Re-insertion of books in Rajaram Bridge Open Library; Attendance of BJP corporators at Swapnil Dudhan's activity
पुणे. दि.30 जून
2024 (Checkmate Times): कर्वेनगर (Karvenagar) प्रभागातील राजाराम पुलाच्या (Rajaram Bridge) चौकात मातोश्री वृद्धाश्रमाजवळ (Matoshree
Old Age Home) माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने (Laxmi Dudhane) यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आलेले मात्र काही कारणास्तव बंद पडलेले
खुले ग्रंथालय (Open Library) अर्थात “पुस्तकघर” (Pustak Ghar) पुन्हा एकदा नागरिकांच्या सेवेत सुरु करण्यात
आले असून, त्यात आता पुस्तकांचे री-इन्सर्शन (Re-Insertion) करण्यात आले आहे. आज रविवार दि.30 जून 2024 राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यदिनानिमित्त (Rajmata Jijau Death Anniversary) बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) आपल्या
दृष्टिहीनतेवर मात करत नागरिकांना सेवा
पुरवणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या हस्ते हा उपक्रम पुनर्जीवित (Resurrected) करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यावेळी भाजपाच्या माजी नगरसेवकांची (BJP Corporators) देखील उपस्थिती होती.
याबाबत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष (NCP Kothrud Vidhansabha President) स्वप्नील दुधाने (Swapnil
Dudhane) यांनी सांगितले की, शनिवार दि. 19 जून 2021 रोजी पुणे मनपाच्या (PMC Pune) या अनोख्या उपक्रमाचे ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे (Sadanand More) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक कारणांस्तव सदर उपक्रम तात्पुरत्या स्वरूपात स्थगित (Adjourned) करण्यात आला होता. दरम्यान सेवाव्रत फाउंडेशनचे (Sevavrat Foundation) प्रदीप देवकर (Pradip Deokar) सदर उपक्रमास नवसंजीवनी देण्याची मनीषा बोलून दाखवली. त्यानुसार आता पुन्हा एकदा “पुस्तकघर” नागरिकांच्या सेवेत सुरु करण्यात आले
आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे आपली वाचून झालेली पुस्तके या ठिकाणी जमा करावीत आणि आपल्याला हवी असणारी पुस्तके घेऊन जात वाचन
संस्कृतीला बळ द्यावे असे आवाहन दुधाने यांनी केले आहे.
यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, भाजपाचे माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे (Rajabhau Barate), दीपक नागपुरे (Deepak Nagpure), राहुल तुपुरे (Rahul Tupere) यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत (Mahesh Sawant), प्रभागातील नागरिक आणि सेवाव्रत फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. स्वप्नील दुधाने यांनी कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी काही
दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar Gat) पक्षाकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता दुधाने यांच्या या
उपक्रमाला भाजपाच्या राजाभाऊ बराटे आणि दीपक नागपुरे यांची असलेली उपस्थिती
चर्चेचा विषय (Topic of Gossip) ठरली आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share