Type Here to Get Search Results !

खडकवासला मतदार संघावर महायुतीकडून राष्ट्रवादीचा दावा; अजित पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

NCP claims Khadakwasla constituency from Mahayuti; Activists demand from Ajit Pawar

 

NCP claims Khadakwasla constituency from Mahayuti; Activists demand from Ajit Pawar

 

पुणे, दि.21 जुलै 2024 (Checkmate Times): आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण जसजसे गरम होऊ लागले आहे, तसतसे विधानसभा मतदार संघावर दावे प्रतिदावे सुरु झालेले आहेत. असाच एक दावा महायुतीतील अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Gat) पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे. सध्या खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजपाचे आमदार असून, तो मतदार संघ पुढच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला सोडला जावा, अशी एकमुखी मागणी खडकवासला विधानसभा मतदार संघातील (Khadakwasla Vidhansabha) कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

 


 

गुरुपौर्णिमेच्या (Guru Pornima) पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची खडकवासला विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), खडकवासला विधानसभा अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ (Baba Dhumal), माजी नगरसेवक दिलीप बराटे (Dilip Barate), दत्तात्रय धनकवडे (Dattatray Dhankawade), आप्पा रेणुसे, शुक्राचार्य वांजळे (Shukracharya Wanjale), विकास दांगट (Vikas Dangat), अक्रूर कुदळे, शैलेश चरवड, प्रवीण शिंदे, सायली वांजळे (Sayali Wanjale), दिपाली धुमाळ, सुवर्णा पायगुडे, युवराज बेलदरे, प्रकाश कदम, शंकर उर्फ बंडू केमसे, अश्विनी भागवत, सागर भागवत, राजेंद्र पवार, बाळासाहेब कापरे, दिवाकर पोफळे, मयूरेश वांजळे (Mayuresh Wanjale) यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी सदिच्छा भेट घेत हि मागणी केली.

 

 

Checkmate Times Smart Awards

 

या पत्रावर अजित पवारांनी या मागणीला दुजोरा दिला आहे. जागा वाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत या पत्राचा संदर्भ देऊन, मागणी करण्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले असल्याचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले. मात्र उपस्थितांपैकी कोणाचे एकाचे नाव मात्र अद्याप निश्चित झाले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अजित पवार यांनी सर्वांनी एकत्र बसून, नाव निश्चित करण्याचा सल्ला देखील दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सद्यस्थितीला खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या अजीत पवार गटातून रुपाली चाकणकर, दिलीप बराटे, विकास दांगट, दत्तात्रय धनकवडे आणि मयुरेश रमेश वांजळे हे इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे यावर आता अजित पवार गटात कोणाच्या नावावर एकमत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

Checkmate Times Smart Awards

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Checkmate Times Smart Awards


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.