Type Here to Get Search Results !

पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून वारजे परिसरातील पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

Inspection of flood damage in Warje area by Pune Municipal Commissioner Dr. Rajendra Bhosale

 

Inspection of flood damage in Warje area by Pune Municipal Commissioner Dr. Rajendra Bhosale

 

पुणे, दि.27 जुलै 2024 (Checkmate Times): खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वारजे मधील तपोधाम परिसर आणि सिंहगड रस्त्यावरील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी आज शनिवार दि.27 जुलै 2024 वारजे मधील तपोधाम परिसरात पूरग्रस्त भागातील झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त विजय नायकल यांच्यासह, माजी नगरसेवक सुशील मेंगडे आणि पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने पुणे शहर व ग्रामीण भागांमध्ये पूरजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका व पुणे महानगरपालिकेच्या संबंधीत क्षेत्रिय कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी असे एकूण 2 हजार 304 सदस्यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर त्यांना आवश्यक त्या मशिनरी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सदर विशेष स्वच्छता मोहिमेकरिता एकूण 96 जेसीबी, 40 डीपी, 50 वीआरसी, 8 हायवा, 35 जेटिंग, 121 घंटागाड्या, 294 छोटा हत्ती, 121 कॉम्पेक्टर, 29 बिन निफ्टर व 40 टीपर याचा वापर करुन घेऊन एकूण 228 टन कचरा, 26.5 टन गाळ व 33.5 टन झाड कटिंग कचरा सकलित करण्यात आला. जेटिंग मशिन्स, जेसीबी मशिन्सद्वारे खोलवर स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर किटक प्रतिबंधात्मक औषधे फवारणी व ब्रीडिंग स्पॉट नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा स्वच्छ पाणी व शौचालय सुविधा पुरविण्यात आल्या. त्याचप्रमाणे आरोग्य तपासणी मोहीम व विशेष वैद्यकीय पथकांद्वारे स्थलांतरित केलेल्या नागरिकांमध्ये साथरोग नियंत्रण कार्यक्रम "सफाई अपनाओ बिमारी भगाओ" हि विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

 

 

 

या सर्व कामांची महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त बी. पी. पृथ्वीराज, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त संदिप कदम, परिमंडळ 3 चे उप आयुक्त संजय शिंदे यांनी डेक्कन जिमखाना, भिडे पूल, पुलाची वाडी, पाटील इस्टेट, संगमवाडी, तपोधाम, कर्वेनगर, सिंहगड रोड, निंबज नगर, आदर्श नगर, सनसिटी उड्डाणपूल, फुलेनगर विश्रांतवाडी, शांतीनगर झोपडपट्टी परिसर व मुळारोड वसाहात अश्या सर्व पूरग्रस्त ठिकाणी पाहणी केली, त्याचबरोबर नागरीकांसोबत संवाद साधला. या आपत्कालीन परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे तातडीने निवारण करणे विषयी आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना देऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, नागरिकांच्या सोयीसाठी ती 24 तास कार्यरत असल्याचे आयुक्तांनी यावेळी अधोरेखित केले.

 

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.