Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.4
जुलै 2024 (Checkmate Times): पुण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज आणि संत
ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुणेकरांनी स्वागत केले. तसेच उत्साहातील स्वागत
कर्वेनगर मध्ये देखील झाले. कर्वेनगर मधील हिंगणे होम कॉलनी येथील सभागृहात दरवर्षी प्रमाणे
आनंद तांबे यांनी वारकऱ्यांची सर्व व्यवस्था करून, स्वागत केले. यावेळी वारकरी
मेळावा देखील संपन्न झाला.
भव्य दिव्य अशा मंडपात वारकऱ्यांच्यासोबत परिसरातील
नागरिकांनी झिम्मा, फुगडीचा आनंद लुटलाच, शिवाय कीर्तन भजनात देखील कर्वेनगर वासीय
तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमासाठी करून पुणे महानगरपालिकेचे
सहाय्यक आयुक्त विजय नायकल, आरोग्य निरीक्षक राजेश आहेर आणि क्षेत्रीय कार्यालयाचे
अधिकारी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब
बराटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष
माणिक दुधाने, नगरसेविका वृषाली चौधरी, मीना
मोरे, मंदाकिनी वन्साळे, वैशाली
दिघे, जगदीश दिघे,
वैशाली दिघे, नामदेव
राजगुरू, राजू चव्हाण, राजू
गाडेकर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते
पदाधिकारी महिला व योगा ग्रुपचे सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे अन्नछत्र नियोजन रामराव कदम, अशोक
कदम, सोपान कावळे, कल्याण
कदम, नामदेव कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. त्याचप्रमाणे सेवा आरोग्य
फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार
मोफत देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते शुभम शिंदे यांनी
केले. तर आभार प्रदर्शन आयोजक असलेल्या आनंद तांबे, दिंडी चालक ह.भ.प. विश्वंभर
घुमरे महाराज यांनी केले. यावेळी कर्वेनगर मध्ये वारकऱ्यांच्या झालेल्या स्वागत
आणि आदरातिथ्याने वारकरी भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. तर पुढच्या वर्षी
पुन्हा येण्याचे आश्वासन ठोस देऊन, वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share