Type Here to Get Search Results !

वडगाव वारजेच्या सीमेवरून देशी बनावटीच्या 4 पिस्तुलांसह 2 जण गजाआड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

2 persons with 4 country-made pistols from the border of Vadgaon Warje


2 persons with 4 country-made pistols from the border of Vadgaon Warje behind bar


पुणे, दि.11 जुलै 2024 (Checkmate Times): वडगाव आणि वारजेच्या सीमेवरून चार गावठी पिस्तुलांसह दोन जणांना गजाआड करण्यात पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून जवळपास 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांचे देखरेखीखाली पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व पवन भोसले यांना गोपनीय माहितगाराकडून याबाबत माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली, खंडणी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे, आजिनाथे येडे, पवन भोसले, संग्राम शिनगारे, विजय गुरव, सैदोबा भोजराव, गणेश खरात, चेतन आपटे, राहुल उत्तरकर, चेतन शिरोळकर, चेतन चव्हाण यांच्या पथकाने हि कारवाई केली.

 

 

गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाने मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव खुर्द येथील मधुकोष सोसायटी समोरुन प्रयेजा सिटीकडे जाणाऱ्या कॅनॉल रोडला सापळा रचून वारजेच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संकेत शिवाजी गांडले (वय 21 वर्षे, रा. नांदेड फाटा, पुणे) आणि मंगेश राजु भोसले (वय 21 वर्षे, रा. कोल्हेवाडी, सिंहगड रोड फाटा, पुणे) यांना संशयावरून अडवून, त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे एकूण 4 पिस्टल व 7 जिवंत काडतूसे असा 1 लाख 3 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, त्याचे विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.