Type Here to Get Search Results !

कोल्हापुरी चोरट्याचा, दत्तवाडी मध्ये राहून कर्वेनगर मध्ये उच्छाद; अलंकार पोलिसांचा बुक्कीत टेंगुळ

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

Chain Snatcher Arrested by Alankar Police, who Snatched Gold Chains in Karvenagar

 

Chain Snatcher Arrested by Alankar Police, who Snatched Gold Chains in Karvenagar

 

पुणे, दि.30 ऑगस्ट 2024 (Checkmate Times): सकाळच्या मोकळ्या हवेत फिरायला बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र चोरणाऱ्या कोल्हापुरी चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात अलंकार पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. हा चोरटा दत्तवाडी मध्ये राहण्यास असून, तो राजाराम पुलापासून कर्वेनगर हद्दीत प्रवेश करून, महिलांच्या गळ्यावर हात साफ करून, परत दत्तवाडी मध्ये गायब होत होता. मात्र अलंकार पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत त्याला गजाआड केले आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर मधील बाबुराव पडवळ रोडवर सुषमा संदेश पोखरकर (वय.47, रा. सिंहगड रोड, पुणे) या सोमवार दि.26 ऑगस्ट 2024 सकाळी पावणे सहा वाजता सकाळच्या मोकळ्या हवेत फिरायला गेलेल्या असताना, त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीचे, दोन साखळ्या असलेले व दोन वाटया असलेले सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले होते. त्याबाबत अलंकार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिता रोकडे यांनी तात्काळ गुन्हा नोंद करुन तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा नोंद करुन तपासास सुरूवात केली होती. दरम्यान पुन्हा दोन दिवसांनी बुधवार दि.28 ऑगस्ट 2024 सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याच पद्धतीने सोनसाखळी चोरीची घटना घडली. यामध्ये ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले होते.

 

 

एकामागे एक घडत असलेल्या या घटनांचे गांभीर्य ओळखून अलंकार पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत काळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवुन, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करत तपास सुरु केला होता. दरम्यान गुरुवार दि.29 ऑगस्ट 2024 रोजी कर्वेनगर मधील डीपी रोडवर सोनसाखळी चोरीच्या अनुषंगाने अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांच्या मार्दगर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत काळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश निंबाळकर, पोलिस अंमलदार धीरज पवार, सोमनाथ यादव, शशिकांत सपकाळ, माधुरी कुंभार, आशिष राठोड, शिवाजी शिंदे, सागर शिवडकर यांचे पथक गस्त घालत असताना, सोनसाखळी चोरीच्या सीसीटीव्ही फुटेजशी साम्य असलेला एक 20 ते 25 वय असलेला काळा टी शर्ट, निळया रंगाची ट्रॅक पॅन्ट व काळया रंगाची टोपी घातलेला इसम हा एका स्प्लेंडर मोटारसायकलवर बसलेला आढळुन आला.

 

 

यावेळी पोलिसांच्या पथकाने त्याच्याजवळ जाताच, तो पळुन जावू लागल्याने, त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग करत, त्यास शिताफिने ताब्यात घेण्यात अलंकार पोलिसांना यश आले. यावेळी त्याला अलंकार पोलिस स्टेशनला आणून, विश्वासात घेत, नाव पत्ता विचारला असता, त्याचे नाव अक्षय गणपती तोडकर (वय २३ वर्षे, सध्या रा. दत्तवाडी, पुणे. मुळ रा. करंबळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापुर) असल्याचे त्याने सांगितले. दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने त्याचेकडे तपास केला असता, अक्षय तोडकर यानेच त्या सोनसाखळी चोरी केल्याचे कबुल केले. यानंतर त्याला अटक करुन तपास केला असता, त्यानेच दोन्ही गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची चैन, मोबाईल, मोटार सायकल असा एकूण 1 लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित काळे करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.